द मरुन रोब
आम्ही दोघं पार्टीहून घरी आलो तर सासूबाई रडतायत, सासरे समजूत घालतायत आणि माझे आई वडील बघतायत असा नजारा होता. मला वाटलं, आजे सासूबाईंची तब्येत मधे फारच नाजूक होती त्यांनी बहुतेक व्हर्टिकल टेक-ऑफ घेतलेला दिसतोय. प्रसंगाचं गांभीर्य बघून मी सीरियसली विचारलं 'आहो, काय झालं? '
तर आई म्हणाली 'तुझ्यामुळे रडतायेत!'.
मला जाम टोटल लागेना, मी प्रश्न रिपीट केला 'काय झालं? '
तर सासूमां म्हणाल्या 'तुम्ही ऐन उमेदीत अध्यात्माला लागलात, मला काळजी वाटतेय'
'कसली? '
'तुम्ही सगळं सोडून जाल'
'कशाबद्दल? '
'सगळे अध्यात्माला लागलेले संसार टाकून जातात, तुमचा बुद्ध नाही का तान्हं मूल आणि बायको सोडून गेला?
मिसळपाव