बळी........
नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......
===
==
=
==
===
तशी मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. शेजारीच राहायची आमच्या. शेजार्यांच्या दारात त्यांनी पाळलेल्या कोंबडीच्या लहान लहान पिलांबरोबर खेळायची, त्या पिलांना दाणे भरवायची. तेव्हाच माझ्या मनात हे असले विचार येऊ लागले होते.
मिसळपाव