गोष्ट एका अंगठीची
घराच्या दारासमोर पायरीवर रामा एकटाच विमनस्क अवस्थेत बसलेला होता. गेले दोन दिवस लोकांचे प्रश्न ऐकून ऐकून बिचार्याचा जीव कावला होता.
'कमळी कुठं गेली रे? '
'रामा, तिला कुणी पळवलं तर नसेल? '
'तिचं कुणासंगट लफडं होतं का रे?'
'गावात सगळीकडं शोधलं म्हंतोस, खरं गावातल्या पडक्या हिरीत बघितलास काय रे?'
एकेकाचा एकेक प्रश्न. आणि एकाही प्रश्नाचं उत्तर बिचार्या रामाकडे नव्हतं. 'पाचामुखी परमेश्वर' असं म्हणतात खरं, पण अशा वेळेला लोकांच्या तोंडून परमेश्वर नव्हे सैतान बडबडत असतो, याचा पुरेपूर अनुभव रामा दोन दिवस घेत होता. शब्द वेगळे, प्रश्न वेगळे परंतु सगळ्यांचा अर्थ एकच होता- कमळी गायब आहे.
मिसळपाव