काळ कोठडी (भाग -२)
पहिला भाग
अजून राहुलला जगायचे होते.. वर्षानुवर्षे जगायचे होते.. नियती पुढचा खेळ मांडत होती, साऱ्या सोंगट्या आत्ता जवळ येत होत्या.....
"बेटी, बहोत दर्द है क्या जीवन में ..मुक्ती चाहिये?".. अनाहूत प्रश्नांनी उषा भानावर आली. विचार करता करता त्या रस्त्यावरच्या बाकड्यावर तिचा डोळा लागला होता.तिचीच तिला लाज वाटली. पदर सावरून घेत तिने समोर पहिले. तिची धांदल पाहून तो म्हातारा गालातल्या गालात हसत होता. ती फणकारयाने म्हणाली.. "आप की कुछ तकलीफ, अपना रस्ता नापो, चलो बडे आये मुक्ती देणे वाले" .. आणि निघणार तोच म्हाताऱ्याने तिचा हात पकडला..
मिसळपाव