दोन अनोळख्या मधला एक दूवा
"ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले ,
" वेळ जात नसेल तर वाचा"
आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण
"धन्यवाद"
असाच होता."
माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट.
हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिव
मिसळपाव