सायकलच्या आठवणी
एका गल्लीतून पोरांचा घोळका सायकलींवरून बाहेर पडला, त्यांना बघून मी थांबलो. पुढच्या सिग्नलपर्यंत त्या पोरांनी रस्ता अडवला होता. मग ती परत एका गल्लीत घुसली. बहुतेक एका क्लासवरून दुसऱ्या क्लासला जात असावी. पण त्या पोरांमुळे माझ्या सायकलीच्या आठवणी जाग्या झाल्या.
मी आणि माझी सायकल 'एक दिल एक जान' होतो तेव्हा. शेजारच्या मित्राकडे, म्हणजे दोन इमारतीसोडून राहणाऱ्या मित्राकडे जायला मला बुडाखाली सायकल लागायची. आई बाबा वैतागायचे कधीतरी पण लक्ष नाही द्यायचे.
इयत्ता पहिलीच्या शेवटी माझी सायकल आली. आठशे ब्याऐंशी रुपयांची.
मिसळपाव