Skip to main content

कथा

शेवटचा पुरावा!

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 31/10/2019 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
"आपूनने बोला ना एक बार..... आपूनको नै पता." "तेच तर विचारतोय मी. क्या नही पता?" "यही की खून कैसे हुआ!" "कैसे हुआ?" "अब्बे घोंचू, जो नही पता वो कैसे बताएगा आपून?" एकदम टपोरी स्टाईल मध्ये उत्तर आले आणि केदारनी कमरेचा बेल्टच काढला. सटाकंsss! सटाकंsss! "अबे तेरी.....कितना जोरसे मारता है बे!" "बोल.... का केलास खून? कसा केलास?" "आपून बोला ना..... आपूनने नै कियेलाए मर्डर! नै कियेलाए!" शेकाटलेलं बूड चोळत तो भिंतीला चिकटून उभा राहिला. "अच्छा?

बालकथा

लेखक ऋतु हिरवा यांनी मंगळवार, 29/10/2019 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा १ आजीची वामकुक्षी झाली होती आणि कडेला चार वर्षाच्या अनिशची चुळबुळ चालू होती. आजी.....कधी उठायचं? ही बघ उठलेच ....असे म्हणत आजी उठली. आजी...आजोबा पण उठले... हो रे बाळा....चल मी तुला आता दुध देते....असे म्हणत आजीने चहासाठी आधण ठेवले. हे तू काय करतेस?? अनिश चिवचिवतच होता ... चहा करतेय रे बाळा ..... आजी ..मला पण चहा .... लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा.....आजीने डोळे वटारले .. मग मोठी माणसे का पितात? हं....आजीबाई द्या आता उत्तर ...असे म्हणत आजोबा स्वयंपाकघरात आले... बघा....चिमुरडा कसा शब्दात पकडतोय....असे म्हणत आजीने त्याला उचलून घेतले....व त्याची गोड पापी घेतली.

शोध (भाग एक)

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी मंगळवार, 29/10/2019 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज कथा पूर्ण झाली. एक महिना या कथेवर काम करत  होतो. तसं पाहिलं तर मी पुर्ण वेळ लेखक नाही. पण मला कथा लिहायला आवडतात. लघुकथा. सुचेल तशी लिहितो आणि शनिवारी रविवार त्या व्यवस्थित संकलित करून ठेवतो लॅपटॉपवर. माझं नाव विनित सदानंद राऊत. मी पुर्ण वेळ अकाऊंटंट आहे. आज मी या कथांबद्दलच एक कथा सांगणार आहे. कथा सुचली की मी मोबाईलमध्ये टाईप करून नंतर लॅपटॉपवर कॉपी करत होतो. अशा वीस पंचवीस कथा लिहिल्या होत्या मी. पण त्या फक्त माझ्या लॅपटॉपवर होत्या. कधीही कुठेच शेअर केल्या नव्हत्या कारण मला त्यांचं एक पुस्तक प्रकाशित करायचं होतं. "कथागंध" नाव पण ठरवलं होतं मी.

कथा-चिखल गुलाब

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 17/10/2019 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा पहिल्यांदा या इथं सायकल चालवायला शिकलो असेल तेव्हा अगदी हाफचड्डी होतो मी ..आता फक्त वय वाढलंय बाकी सगळं आहे तिथं आणि तसंच आहे. फुलपॅन्टवाला मोटरसायकलस्वार असा विचार करत नदीच्या कडेने निघाला. त्याची नजर पुन्हा तेच सारं शोधत पुढे निघाली. भला मोठा नदीकाठचा विस्तार.कपडे धुवायला आणि म्हशी आंघोळीसाठी म्हणून फार वर्दळ राहते या पायरस्त्याला!

मी अजिबात घाबरत नाही....! - ३

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 15/10/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितक्या वेगाने गाडी पळवत मी पलाश मार्गावर पोचलो. तिची कार तिथेच बंद अवस्थेत उभी होती. माझ्या उरात धडकी भरली. मी जवळ गेलो आणि जीवात जीव आला. ती आत बसली होती. मोबाईल कानाला लाऊन. मी बाहेरून खिडकीवर मध्यमा आणि तर्जनीच्या पाठमोऱ्या बाजूने टकटक वाजवलं आणि ती चांगलीच दचकली. काहीतरी बोलली आनंदानी. मी तिला काच खाली घ्यायची खूण केली आणि तिने सरळ दार उघडून मला घट्ट मिठी मारली. घामाघूम झाली होती अक्षरश: "बरं झालं आलास. तुझा फोन का लागत नव्हता रे? किती घाबरले होते! बघ गाडी बंद पडली अचानक." त्या पक्याला मी सोडणार नाही. मागच्या वेळी माझी गाडी बंद पाडली.

काउन्टिंग (Counting)- शशक.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 15/10/2019 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर, नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव आई म्हणायची राग आला की उलटे आकडे मोजायचे. एकुणनव्वद, अठ्ठ्याऐशी..सत्त्याऐशी मग राग पळून जातो म्हणे... एक्क्याऐशी, ऐंशी .... ऐंशीच्या आधी काय?? नेहमीच चुकतं माझं इथे. अंअं आठवलं, सत्तर, एकोणसत्तर.. पण मग बाबा का नाही म्हणत उलटे अंक कधी ? बाबांना मात्र आई कध्धीच काही सांगत नाही की रागवत नाही. सगळी शिकवणी काय ती मलाच. चव्वेचाळीस, त्रेचाळीस... तरी बाबा रागावतात तिला. मारतात सुद्धा. हे काय आत्ता पण किती मारलं. किती हलवलं तरी उठतच नाहीये ती. चोवीस, तेवीस... मग? मला राग नाही येणार बाबांचा?

निनावी कथा

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 11/10/2019 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला....

दसरा आणी श्रीखंड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
आला दसरा............ दसरा आणी श्रीखंड दसरा आणी श्रीखंडा चे एक अतूट नाते आहे.. लहान पणी चक्का तयार करणे म्हणजे साधारण ३-४ आधी दिवस तयारी असायची. साय साठवणे ..व सा~याना पुरेल इतक्या श्रीखंडा इतके दही झाले कि मग ते एका फडक्यात बांघून ते भिंतीला टेकेल अश्या रितेने खुंटीला टांगले जायचे..ज्या मूळे त्यातले पाणी भिंत शोषून घेई व घट्ट चक्का बनत असे. पूर्वी भिंती भेनड्याच्या म्हणजे मातीच्या विटाच्या असायच्या.. सकाळीच चक्का व प्रमाणात साखर .. दुध घालून घोटणे सुरु व्ह्यायचे.. मग सहाणीवर दुधात जायफळ उगाळणे.

पेंन ड्राइव्ह

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
खूप छान व हॅण्डसम दिसतेस -बघत राहावेसे वाटते -प्रिया म्हणाली काहीतरी काय- साधा माणूस आहे -सरळ साधा संवेदना क्षम मनाचा तो म्हणाला म्हणून तर मला आवडतोस -प्रिया पण तुला माझी पर्वा नाही -प्रिया असं का बोलतेस ? तू ज्या ब्यांकेत काम करतोस तिथल्या क्लायंट्स ची लिस्ट माहिती मला हवी होती माझासाठी ते फार महत्वाचे आहे -माझं प्रमोशन -पगार वाढ सार त्यावर अवलंबून आहे -प्रिया त्या बदल्यात आपण लग्न करणार अशी तुझी ऑफर आहे -तो काहीतरी बोलू नकोस -ऑफर मला आली आहे -माहिती त्या बदल्यात प्रमोशन -पगार वाढ - आपण लग्न करणार कारण तू मला व मी तुला आवडतात म्हणून -प्रिया हो मंदसा हसला -तिच्या हातात पेंन ड्राइव्ह

मोठा मासा आणि छोटा मासा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 07/10/2019 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोठा मासा आणि छोटा मासा .. बारक्याने आपले घारे डोळे थोडेसे आणखीन बारीक केले. हातातील सिगरेटचा एक मोठा झुरका घेऊन तोंडाचा चंबू करून परत एक धुराचे वर्तुळ बाहेर सोडले. मग आपल्या केसावरून एकदा हात फिरवला. मग उगीचच शेजारी बसलेल्या ढापण्याला पाठीत एक गुद्दा ठेऊन दिला. ढापण्या पीत असलेल्या चहाच्या ग्लास मधून थोडा चहा हिंदकळून खाली पडला. नशीब त्याच्या अंगावर सांडला नाही. बारक्या एकदम हसायला लागला. त्याचा गोरा चेहरा एकदम लालबुंद झाला. मग त्याला एकदम ठसकाच लागला. सिगरेटचा धूर आपण बाहेर सोडायचा होता का आत घ्यायचा ?हेच त्याला समजेना आणि त्याचा ठसका परत वाढला.