Skip to main content

कथा

राधी आणि मास्तर

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 30/07/2019 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
बस देवगाव फाट्यावर आली. कंडक्टरने जोरात आवाज दिला, "देवगाव फाटा कोणी आहे का"? कंडक्टरच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला. हातातील पिशवी सावरत बसमधून खाली उतरला. कंडक्टरने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत दरवाजा जोरात बंद केला. बस पुढे निघून गेली. पुढे जाणार्‍या बसकडे बघत त्याने खांद्यावरची पिशवी सरळ केली. कपडे झटकले.     त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बस वाटेत बिघडली नसती तर आपण वेळेत गावात पोहोचलो असतो, असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या पाटीवर गेले. ' देवगाव तीन किमी'. फाट्यापासून गाव आत तीन किमी होता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.

खुलं मैदान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 30/07/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे. "साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली? "बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो. "गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला. "गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात." "चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती.

समाधीवरचा गाव (एक भयकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 29/07/2019 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'सावरगाव' जेमतेम हजार-दीडहजार लोकसंख्या असलेल छोटस गाव. तस पाहायला गेल तर, सभोवताली असलेल जंगल आणि त्यात असणाऱ्या प्राण्याशिवाय गावाला दुसरी काही ओळख नाही. उतरत्या छपराची घरे, समोर अंगण आणि त्याभोवती ताराचे कुंपण अशी साधारण घरांची रचना. जंगलातील प्राणी घरात घुसू नये म्हणून तारेचे कुंपण हमखास घराभोवती पहायला मिळत होते. जंगलातील प्राणी कधी घरात घुसून पाळीव प्राण्याचा, लहान मुलांच्या गळ्याचा घोट घेईल याची याची शाश्वती नसायची. गाव मधोमध जंगलात असल्यासारखे होता. तिन्ही बाजूला जंगल आणि उरलेल्या एका बाजूला नदी. त्यामुळे गाव जंगलात असल्यासारखेच भासायचे. शेती हा गावातील एकमेव व्यवसाय.

४_किलबील किलबील पक्षी बोलती.

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 28/07/2019 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंगीत, उठुन दिसणारं ठळ्ळक, शिट्टी सारखं हव?...….. लाल..... हिरवा... पिवळा... नीळा....नील. हां नील. चमकदार , रंगीत उठून दिसणारे ठळ्ळक आहे. लांबून आईने " ए नी.........ल" अशी हाक मारली तर कोणीतरी शिट्टी वाजवतंय असं च वाटेल. " " व्वा काका छान नाव दिलंत मला. मस्त रंगीत नाव " " आणि माझं नाव काय हो काका" मला पण छानसं नाव द्या . पण नुसत्या एखाद्या च रंगांचं नको. सगळे रंग यायला हवेत त्यात" मागील दुवा
मागील दुवा http://misalpav.com/node/44930 रेघवाल्या मुलीचा नावासाठी हट्ट चालूच होता. हीच्यासाठी काहितरी नाव शोधायलाच हवं.

युगांतर-आरंभ अंताचा! भाग १२

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 27/07/2019 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
भीष्मांनी रथ नदीकाठी थांबवला. मनातली घालमेल त्यांना महालात बसू देत नव्हती. नदीकाठी बसून गंगामातेशी बोलून त्यांना मन शांत करावेसे वाटू लागले. त्यांनी नमन करून गंगेला आवाहन केले. एकदा.... दोनदा.... तिनदा.... पण गंगामाता कुठेच दिसेनात. भीष्म अस्वस्थ झाले. "माते.... आपण प्रकट का होत नाही?" भीष्म नदीतटावर वाकून हातात जल घेण्याचा प्रयत्न केला, परंतू जल त्यांच्या हातात येईच ना. " त्या रुष्ट झाल्या आहेत वसूदेव...." भीष्मांनी वळून पाहिले. एक सुंदर स्त्री उभी होती. तिचे सौंदर्य दैवी भासत होते. "आपण कोण देवी?" "जिच्या इच्छापूर्ती करता तुम्ही गाय पळवून आणलीत, आर्य!

३_ किलबील किलबील पक्षी बोलती.

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/07/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
या आकृतीत गोलाला दोन छोट्या रेषा जोडून त्या खाली दोन फुल्या मारल्या. मुलाचे आणि मुलीचे अगदी कमीत कमी रेषांमधे. मग जवळंच आणखी काही रेषा जोडून एक कौलारू बैठी इमारत काढली, शाळेच्या इमारती सारखी. खडूच्या आणखी दोनचार जुजबी फरकाट्यात शाळेची इमारत जिवंत व्हायला लागली . दोनचार ठिपके इकडे तिकडे दिले . मैदानात खेळणारी मुले दिसायला लागली.....
मागील दुवा http://misalpav.com/node/44923 अजून काय करता येईल बरे….. खरे तर असा विचार डोंगरे सर चित्र काढताना कधीच करत नाहीत.

किलबील किलबील पक्षी बोलती(२)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 26/07/2019 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44903
चित्र पाहून झाल्यावर त्यानी आपल्या पाठीवर थाप मारली , घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. फार काही बोलले नाहीत पण म्हणाले आज मी चित्र कानांनी ऐकली. सनै चौघड्याचे आवाज, राज्याभिषेकाचे मंत्रघोष , गर्दीतली दबकी कुजबूज, सगळं ऐकू आलं रे, बोलकी चित्रे काढतोस.म्हणत खूप वेळ आपला हात हातात घेवून काही न बोलता त्यावर नुसते थोपटत राहीले.
आर्ट्स स्कूल ला असताना चित्र कसे पहावे याचे गायतोंडे सर खूप सुंदर प्रात्यक्षीक द्यायचे. त्यांनीच तर शिकवलं होतं हे. आपली चित्रं बोलकी असतात.

किलबील किलबील पक्षी बोलती...

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/07/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
"सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे, हा दागीना मिरवायचा की मोडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे" फळ्यावर हा सुविचार लिहून डोंगरे सर थाम्बले. फळ्यावरच्या त्या अक्षरांकडे पुन्हा एकदा पाहिलं. ओल्या फडक्याने पुसलेल्या काळ्याकुळकुलीत फळ्यावर ती पांढर्‍या खडूने काढलेली अक्षरे टिप्पूर चाम्दण्यासारखी दिसत होती. अक्षरे पहात असताना त्यांना का कोण जाणे रफीचे " फलक पे जितने सितारे है वो भी शरमाये…" हे गाणे आठवले. या फळ्यालाही फलक म्हणतो, आणि त्या आकाशालाही फलक असेच म्हणतो. गंमत आहे ना?

रात्र थोडी..

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 22/07/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते. "आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो. "मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे. "ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी. "गांजा तो हम भी पीते है.

प्रेम 1

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 19/07/2019 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच तिच्यावर खूप प्रेम होतं. ती छान, छोटीशी, त्यांच्यासारखी न फुगलेली, पण कणखर. तिचा तो मोहक तेजस्वीपणा, डौलदार चाल. तिची बाबांभोवतीची प्रदक्षिणा त्याच्या आधी पूर्ण व्हायची. कस जमायचं तिला कोणास ठाऊक. पण बाबांनी मर्यादा घालून दिल्या होत्या सगळ्यांना. आणि बाबाविरुद्ध जायची कोणाचीच हिंमत नव्हती. तो सगळ्यात मोठा तर ती शेवटच्या भावंडांपैकी. अधून मधून तो भांडायचा बाबांशी, पण तेवढ्यापुरते. एकेदिवशी बाबांनी त्याला त्याचे काम सांगितले. ती आता नवनिर्मिती करणार होती. तिच्या त्या नवनिर्मितीमध्ये अडथळा न येऊ देण्याची जबाबदारी त्याची होती.