Skip to main content

कथा

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 27/02/2019 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मराठी भाषा दिन २०१९ च्या निमित्ताने मिपावर आयोजित केलेल्या 'शतशब्दकथा' या मिपावरील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे निकालपत्रक. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. लेखक, वाचक दोघांचाही भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. आकडेवारीतच वर्णन करायचं म्हटलं तर एकूण ६३ कथा आणि १५००+ प्रतिसाद असं करता येईल. पण आकड्यांच्या पलीकडे पाहिलं तर इतके विविध विषय लेखकांनी हाताळले, की वाचकांसाठी ही एक मेजवानीच होती.

वैद्यराज

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/02/2019 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
.... एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनाच सर्वजण डॉक्टर म्हणून हाका मारत. अर्ध्या तासात वैद्यराज आले. वैद्यराज म्हणण्याइतपत काही ते म्हातारे दिसत नव्हते. केस अजूनही काळे होते. तरतरीत नाक व सडपातळ शरीरयष्टी वरून मला तरी ते त्यावेळी तिशीतले वाटले. गावातील परंपरागत चालत आलेली वैद्यकी ते समर्थपणे चालवत होते असे त्यांच्या एकंदरीत अवतारावरून वाटत होते खरे..

ट्युमर - शतशब्द कथा

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 25/02/2019 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते . स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते. "हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.

स्पर्धेबाहेरची श श क गतानुगतिक

लेखक anandkale यांनी शुक्रवार, 22/02/2019 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार लुटीची पाहणी करीत होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही होता. आत खणणाऱ्या सैनिकाला सांगितले. "इथे खोदु नका, तो बडा पत्थर उचला पायखान्यात लावायला" सैनिकाने शेंदूर लावलेला दगड उखणून काढला. पुढच्या देवळात मौल्यवान वस्तूंची पोती भरण्याचे काम चालले होते. " मिळेल ते सगळे भर पण बूतला हात लावू नका " गोंधळलेल्या पोराने विचारले "अब्बाहुजूर तो बुत पायखान्यात आणि हा ?" " तेल पोतलेला दगड पायखान्यात चांगला बसतो, पाणी ओतले कि सगळे वाहून जाते" "तो बुत सोन्याची खाण आहे. बात सगळीकडे फैलेल कि खान इतका ताकतवर, बाकी सगळी देवळे फोडली पण इथे त्याचे काही चालले नाही.

तिसरी इनिंग

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 22/02/2019 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याला 'तिसरी इनिंग' म्हणणं धाडसाचं होईल पण तरी म्हणतोच. माझी पहिली इनिंग झाली बोटीवर. त्याबद्दल तुम्ही सविस्तर वाचलं आहेच. दुसरी चालू आहे ती प्रोफेसरीची, ज्याबद्दल थोडंफार वाचलं आहेत. त्यातून एखादेवेळेस तिसरी निर्माण होण्याची शक्यता आहे. ती होईल किंवा नाही, मात्र आत्ताच त्यात मला मजेदार अनुभव आले ते शेअर करणं जरूर आहे. आमच्या रिसर्च विभागाच्या प्रमुखाची हॉबी आहे डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवणे.

[श श क स्पर्धे बाहेरचे] - मॅच

लेखक टिल्लू यांनी शुक्रवार, 22/02/2019 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
पटापट दोन घास गिळून कुलदीप खेळायला पळाला. आज परत कुल्याची आणि शिऱ्याची मॅच होती. कालच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिऱ्या आज मैदानात उतरला. टॉस झाला, कुल्याच्या गोलंदाजांचे पिसे काढत, शिऱ्याच्या फलंदाजानी १० षटकात १२० धावा कुटल्या. कुल्याचे सलामीचे फलंदाज आणि मधली फळी धावसंख्या ६ षटकात ६० नेऊन परतली. केदयाच्या बरोबरीने त्याने धावसंख्या ९८ केली. शेवटचे षटक, जिंकायाला २३ धाव शिल्लक, मॅच अटीतटीची झाली. तीन चेंडुवर कुल्याने तडाखेबाज षटकार लावत शिऱ्याच्या तोंडचे हसू पळवले.

शशक - वैकुंठ एकादशी

लेखक bhagwatblog यांनी गुरुवार, 21/02/2019 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठ एकादशी देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत नव्हते. मग डॉक्टरांनी तिला अंतिम निर्णय विचारला? तिने दोलायमान स्थितीत एक कठीण पण ठाम निर्णय घेतला. वैकुंठ एकादशीच्या दिवशीच ठीक रात्री बारा वाजताच वडीलांचा व्हेंटिलेटर काढायचे ठरले. अंतिम वेळ जवळ येऊन ठेपली. देविकाने वडीलांचा हसत-हसत कायमचा निरोप दिला.

कायदा

लेखक anandkale यांनी गुरुवार, 21/02/2019 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिवस मी कधी विसरणार नाही. त्या दिवशी खंड्या शाळेत जरा ऊशीराच आला, कपडे सुध्दा चुरगाळलेले होते. मागच्या बाकावर जाऊन एकटाच बसला, कुणाशी काही बोललासुध्दा नाही. मधल्या सुट्टीत पोरांचा गराडा खंड्याभोवती पडला. सगळे नेहमीप्रमाणे खंड्याची टवाळी करू लागले. सुताराचा सुशील त्यात नेहमीप्रमाणे पुढे होता. " काय बाप मेल्यासारखा तोंड करून बसलाय बघा" बाप हा खंड्याचा वीक पाॅईट. खंड्याचा बाप मिलेट्रीत होता. कुठेतरी काश्मीरमधे अतिरेक्यांशी लढत होता. काही शौर्यपदकेही खंड्याच्या बापाच्या नावावर होती. गावातल्या ज्या काही थोड्या लोकांचा पेपरात फोटो आला होता त्यात खंड्याचा बाप एकदम नामचिन होता.

दोसतार-१८

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/02/2019 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/43578
बरे झाले सरांनी टंप्याला निबंध वाचायला सांगितले नाही. मला समोर दोरीने बांधलेले चट्टेरीपट्टेरी लेंगा बनियन घातलेले टंप्याचे बाबा शिंगे उगारून हम्मा हम्मा करत आमच्या अंगावर येताना दिसू लागले.
शाळेत एक बरे असते. मुलांना कधी रिकामे बसू देत नाहीत. एका मागून एक काहीतरी चालूच असते. घटक चाचणी संपली आता काय हा प्रश्नच नसतो. कधी हा उत्सव, कधी तो दिन , तर कधी कसलीशी स्पर्धा चालूच असते.

वाटणी

लेखक सत्य धर्म यांनी मंगळवार, 19/02/2019 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
रामू आणि शेवंताला आजची रात्र सरत नव्हती. म्हातार्‍याच्या दहाव्या बरोबरच पै पाहुण्यांमध्ये अर्जुनाचे लग्न आणि वाटणीचा विषय छेडला गेला होता त्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते. दहा एकर बागायती शेतीत सोन पिकत होतं त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे नवरा बायको सुखी होते त्यात वंशवेल वाढुन आनंदात भरच पडली होती धाकटा अर्जुन शेवंताच्या डोळ्यात खुपत होता त्याचा हिस्सा कुठेच असू नये असं तिला मनोमन वाटत होतं. म्हाताऱ्याचा अर्जुनवर असणारा जीव पुऱ्या गावाला माहीत होता.