Skip to main content

कथा

श.श.क. झडप

लेखक सत्य धर्म यांनी सोमवार, 18/02/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
मनात विचारांचे काहूर घेऊन ती रानातून वाट काढत वस्तीवरच्या घरी चालली होती. महिना झाला तरी गण्या तीचा पिच्छा काही सोडत नव्हता, त्यामुळे घरातून बाहेर निघणं तिच्या जीवावर येत होतं. एकुलती एक मुलगी शिकावी या बापाच्या एका इच्छेसाठी सर्व भीती वाऱ्यावर सोडून ती कॉलेजला जात होती. आज गावात "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यक्रमासाठी तालुक्याची माणसे आली होती पुरा गाव तिथंच जमला होता. स्त्री चळवळीने जोर धरला होता. सरपंचाचे भाषण ऐकतच ती चालली होती. बामनाच्या मळ्यापाशी दबा धरून बसलेला तो एका झडपेत समोर आला आनी तिला उसात घेऊन गेला " बेटी बचाओ बेटी पढाओ" च्या जयघोषात एक किंकाळी हवेत विरून गेली.

दरवळ (शतशब्दकथा)

लेखक किल्ली यांनी बुधवार, 13/02/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
“तुझा आवडता perfume कुठला?” “मी नाही सांगणार, secret आहे.” “दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!” तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला. ठरल्याप्रमाणे त्याने आकाशात उंच भरारी घेतली. पण दुर्दैव! तो अगम्य उंचीवरून कोसळला! त्या परिस्थितीही, आपण तिच्यासाठी काही आणू शकलो नाही ह्या भावनेने आणि अतीव वेदनेने तो जणू अश्रू बनून कोसळू लागला.

लाज - स्पर्धेबाहेरची श श क

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 12/02/2019 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभराच्या दगदगी नंतर राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा. आजची धुंद रात्र काही वेगळीच होती. हवेत रातराणीचा मदमत्त गंध पसरला होता. चालता चालता राजेसाहेब फुललेल्या रातराणीच्या जाळीजवळ जरासे रेंगाळले. कोपर्‍यावरच्या झुडूपामागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राजेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". झुडूपामागच्या बाकड्यावर एका युगूल दिसले. चेहरे ओळखीचे वाटले. प्रधानजी आणि राणीसाहेब. क्षणभर तिघेही दचकले. राणीसाहेबानी चेहेर्‍यावर घुंगट ओढून घेतला. अंधारात काहीच दिसले नाही अशा आविर्भावात राजेसाहेब तेथून दूर गेले.

परग्रहवासी की ..... ?

लेखक अमेयसा यांनी शनिवार, 09/02/2019 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"आपली गती कमी झाली म्हणजे आपण पोचलो का बाबा?" समोर दिसणाऱ्या निळ्या प्रकाशमान गोलाकडे बघत त्याने आपल्या वडिलांना विचारले. काही प्रकाशवर्षे दुरून आलेले ते यान आता एका बिंदू वर स्थिरावत होतं आणि आतिल प्रवासी आपापली उपकरणे घेऊन खालील महाद्विपाकडे जाण्यास सज्ज होत होते. "२ वर्षांपूर्वी तुम्ही इथेच आला होतात का? आणि माझे मित्र म्हणत होते की गेली कित्येक दशकं आपले लोक इथे येत आहेत. खरं आहे हे?" त्याचाच अजून १ प्रश्न. त्याचे वडील या वेळेस खाली जाणार नव्हते आणि फक्त यानाच्या व्यवस्थापन आणि देखरेखी साठी आले होते. त्यामुळेच या मोहिमेसाठी ते आपल्या मुलाला घेऊन आले होते.

मैत्र - ५

लेखक शाली यांनी बुधवार, 06/02/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, किती ओरडशील त्याला? जातोय डॉक्टरकडे आम्ही” बाबा कपडे घालता घालता आईला म्हणाले. पण आईचा राग काही कमी होत नव्हता. “मला हौस आहे म्हणून चिडलेय मी! ‘जरा सडा घालायचाय, शेण आणून देतो का?’ म्हटलं तर तोंड फिरवून जातो हा. मग आता कशाला गेला होता त्या बैलाची शेपटी ओढायला?” म्हणत आईने ओट्यावर भांडे आदळले. काळजीपोटी बडबडत असली तरी मला आता वैताग आला होता तिच्या बडबडीचा. “काही होत नाही, जरासं तर लागलय” असं सगळ्यांना सांगता सांगता आता हात चांगलाच दुखायला लागला होता. इन्नीने लावलेल्या चंदनानेही काही फारसा फरक पडला नव्हता.

क्रश (शतशब्दकथा)

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का.. सूचनांचे स्वागत आहे :) -------------------------------------------------------------------------------------------- छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे.

ग्रीन सिग्नल

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई पावलोपावली जाणवत होती. रोजचा परिचयाचा रस्ता असला तर आपण सराईतपणे गाडी चालवू शकतो.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १३

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 03/02/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १३ (Decorate Your Love) प्रजासत्ताक.. प्रेमाचा हक्क.. आज प्रजासत्ताक दिन.. म्हणजे प्रजेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा दिवस.. हक्क जे जन्म घेतल्यावर आपल्याला आपोआप मिळून जातात.. पण खरंच ते हक्क किती वापरता येतात..? हा प्रश्नच आहे.. ती बोलतच होती कारण त्याला तसेच होते.. तिच्या बहिणीचे तिच्या मनाविरुद्ध ठरत असलेले लग्न.. आज खुप वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र शाळेत भेटत होते.. सर्वजण आल्यावर तिच्या बहिणीच्या लग्नाचा विषय निघाला.. तिच्या बहिणीचेन लग्न ठरले होते..

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

सोनेरी चकवा.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 25/01/2019 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी चकवा . अंडे पहिल्यांदा का कोंबडी ? अनुभव हवा म्हणून मनुष्य जन्म घेतो का तो जन्मतो म्हणून त्याला येईल त्या अनुभवाला सामोरे जावे लागते ? दैव बलवत्तर म्हणून त्याला यश मिळते का प्रयत्नामुळे यश त्याच्या हातात येते ? असे कितीतरी प्रश्न मला सारखे पडत असतात. उत्तर नसणारे . किवा आपल्याला हवे ते उत्तर असणारे . पण मी हे प्रश्न तुम्हाला आत्ताच का विचारतोय ? खरे म्हणजे आत्ता मला हा प्रश्न पडलाय की मला सारखे सारखे हे लाकडी बैठे मेज माझ्या स्वप्नात का दिसते ? हो ..हा महत्वाचा प्रश्न आहे. हे लाकडी बैठे मेज माझ्याकडे नाही ... मग मला ते स्वप्नात का दिसते ?