Skip to main content

कविता

'उषःकाल होता होता' : एक शंका

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 03/08/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले. मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले. तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?

भरवू नकात आता...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 01/08/2017 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
भरवू नकात आता बाजार आरश्यांचा येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा! अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!
काव्यरस

काचेपलिकडचं वास्तव!

लेखक हृषीकेश पतकी यांनी मंगळवार, 01/08/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं । मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।। आतमध्ये शिरताच माझ्या साधेपणाचे पाश तुटतात । साऱ्या सुप्त इच्छांना मग शक्यतेचे पंख फुटतात ।। दिपून जातात डोळे, काही दिसेनासं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।१।। चोहीकडे दिसतात मला जेव्हा वैभवाचे सडे । आणि लखलखणारी सुखं रोखून बघतात माझ्याकडे ।। कसं सामोरं जावं त्यांना मला खरंच कळत नाही । माझं आणि पाकीटाचं, मत काही केल्या जुळत नाही ।। भर पावसात कोरडं राहावं, माझं अगदी तसं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं......
काव्यरस

तू अशी

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 01/08/2017 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
मौन माझे तुला एवढे सांगते तू किती बोलते तू किती बोलते मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती फोनची कंपनी त्यावरी चालते वाजले चार रे, दे मला तू चहा मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते उंट तंबू मधे, आणि उघडयात मी या कपाटात तू, वल्कले कोंबते सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते शस्त्र नाही करी, हार नाही तरी येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते वाढले वय तसे, समज ही वाढली रात्र समजून तू, दिवसभर झोपते राग मानू नको, स्वप्न होते तुझे दिवस संपेल हा, का तरी लोळते

तिच मन कधी कळेल का

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 01/08/2017 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? कधी राग,कधी अनुराग, कधी प्रेम, कधी आग कधी हो, कधी नाही कधी घरी विचारते,कधी माहीत नाही, तू तर रोज सखे भेटतीस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? * कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग कधी भांड भांड भांडतेस, तर कधी गळ्यात पडून रडते कधी स्वत:च खर करतेस, तर कधी माझं चुकलं म्हणतेस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? हे कोड कधी उलगडेल का? तिच मन कधी कळेल का

बाबाचं मन!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 31/07/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
एवढस पिल्लू... My bundle of joy हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय? आईने वाढवलं... जन्माला घातलं! तुझं नाव लावून हातात तुझ्या दिलं... आहेस तू... असणारच आहेस! माझं सगळं तर आईच बघते आहे.. घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे! आपापलं जगणं आपण जगतोच आहे! खरंय पिल्ला... वेळ नाही दिला.. माझं नाव आणि फक्त पैसा दिला! आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं! वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन मन सारं कधीतरी मोकळं करीन पिल्लू जसजसं मोठं झालं आकाश त्याला बोलावू लागलं बेटा आता मीपण थोडा मोठा झालोय दमलो...
काव्यरस

नवकवीस्तोत्र

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 26/07/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

फुंकिले मी प्राण माझे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 25/07/2017 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित
काव्यरस

श्रावणसाद

लेखक Swapnaa यांनी सोमवार, 24/07/2017 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणसाद ~~~~~*~~~~~ वर्षभर सोसून, उन्हाचे चटके, अवनी होरपळून, उष्मात निजते, हस्त जोडून, निसर्ग अभिषेक, मुक्त करेल, वेदना व्याकूळ, स्वागत श्रावणाचे, साद मखमली, श्रावण पाळे, साक्ष इंद्रधनू, सृजन सोहळा, वसंत नाचे, कवी- स्वप्ना..

चंद्रकिनार

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 22/07/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीच्या चंद्रकिनारी श्रावणाची चिंब पहाट उतरुन आला शुक्र निळी निळी पाऊलवाट सावळ्या तरुंच्या छायेत पसरला धुक्यांचा फुलोरा थरथरणाऱ्या पानांतून सांडला शुभ्र कवडसा लाजरा संथ उभ्या जळांत मधुर ओले चांदणे निशब्द ही लहर गाते मंजुळ गाणे वेलींवरचा धुंद गारवा घेवून पंखांच्या कुशीत एक थेंब जागलेला गंध हिरवा वेचित
काव्यरस