Skip to main content

कविता

खिडकीकडून खिडकीकडे

लेखक रंजन यांनी बुधवार, 19/09/2007 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आपले असेच आहे खिडकीकडून खिडकीकडे.. कधी इकडे कधी तिकडे बेन्चावरून बेन्चावरती माझ्या खिडकीचा फडफडे डोळा कितिदा समोरच्या स्क्रिनवरती मनात हलणारी पिंपळपालवी बसलेली विजेच्या लोळावरती पक्क्या गुंतल्या जुनाट गाठी काळ्या गढूळ डोहाच्या काठी अंधारडोह बसला जसा पाठी प्रकाशदीप जातो बुडीत खाती खिडकीकडून खिडकीकडे जुन्या पारावरून पारावरती झोकांड्या खात चालणे आता बेन्चावरून बेन्चावरती
Taxonomy upgrade extras

बोबडे हे बोल माझे..

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 19/09/2007 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आत्ताच टीकाकार - १ यांनी माझ्या 'विहंगगीत' या रचनेला सुमार असे म्हटले आहे. मी या टीकेचे स्वागत करतो. टीकाकार -१ यांनी केलेल्या सुमार या परिक्षणामुळे माझ्याच रचनांबद्दल मला विचार करावासा वाटला आणि सहजच या चार ओळी सुचल्या त्या इथे लिहीत आहे. टीकाकार - १ यांचा मी आभारी आहे! शब्द माझे सूर माझे वाकुडे गाणेही माझे परि सांभाळून घ्या हो बोबडे हे बोल माझे.... धृ गीत माझी प्रीत माझी रीतही माझी जुनीच ताल माझा चाल माझी शाल माझी कांबळीत आजही आकाश गाते चांदण्याचे गीत माझे परि सांभाळून घ्या हो बोब हे बोल माझे...
Taxonomy upgrade extras

शायरे आज़म

लेखक चित्तरंजन भट यांनी मंगळवार, 18/09/2007 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. कुठे काही अडखळले तर जरूर विचारा.. शायरे आज़म कल इक अदीबो-शायर व नाक़िद मिले हमें कहने लगे की आओ ज़रा बहस ही करें करने लगे बहस की अब हिंदो-पाक में वो कौन है के शायरे-आज़म जिसे कहें मैंने कहा 'जिगर'! तो कहा डेड हो चुके! मैंने कहा के 'जोश'! कहा, क़द्र खो चुके मैंने कहा 'फ़िराक़' की अज़मत का तबसरा! बोले 'फ़िराक़' शायरे-आज़म!

चार चारोळ्या

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 18/09/2007 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
- १ - वसंतातल्या पालवी-कळ्या मोठ्या खट्याळ असतात छकुल्या आसुसलेल्या डोळ्यांना, दडून, हळूच आडून करतात वाकुल्या -*- - २ - व्याकूळ दुपारची ऊन झुळूक तहानेला करते त्राही त्राही मिळता तोकडी तुझी चिठ्ठी तळमळ होते लाही लाही -*- - ३ - शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं फारच दिलदार नाही वाटत? शिलंगणाचं सोनं काही दसऱ्यालाच नाही वाटत -*- - ४ - परवा पडलेला शुभ्र बर्फ आज कसा दिसतो रटाळ गतप्रेमाच्या पत्रामधले अक्षर देखील दिसते गचाळ -*-
(याचा कच्चा मसुदा "अप्रकाशित"वर टिचकी मारली असून मनोगतावर दिसतो आहे :-( दोन्ही ठिकाणी प्रकाशित करण्याचा हेतू नव्हता.

सखा श्रावण

लेखक चंद्रप्रभा यांनी रविवार, 16/09/2007 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
सखा श्रावण नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला -चंद्रप्रभा (येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)

ऎसा खत में लिखो

लेखक पंकज यांनी शनिवार, 15/09/2007 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.
Taxonomy upgrade extras

घाटातली पायवाट

लेखक धनंजय यांनी शनिवार, 15/09/2007 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
*** घाटामध्ये रुळालागी नागमोडी पायवाट चालतसे खेडवळ बाई एक झटाझट - ताई एक कळवळे खिडकीशी बसलेली "आम्हांसंगे ये गे, उगी दमछाक चाललेली" - बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे. दरीमध्ये शेत माझे घाटमाथ्या घर असे" - "तिथे कोणी वाट पाहे ऊर येई भरुनिया - मुंबईला तुझ्या घरी तू जा बाई बसुनिया" ***