Skip to main content

कविता

प्रार्थना.

लेखक अशोक गोडबोले यांनी रविवार, 23/09/2007 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.
-- प्रार्थना -- द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम् प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II नाहं जाने माया भेदम् हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II मतिमंदोऽहं अघपथगामी मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II विगतवारिजं मानसविमलम् मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II शिवपदारविन्दे मनशरणम् प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II -- अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०

लेखक जगन्नाथ यांनी रविवार, 23/09/2007 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही. आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे. मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही.

एकमेकांसाठी (दुसरी आवृत्ती)

लेखक धनंजय यांनी रविवार, 23/09/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
(दुसरे संस्करण ) आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा... उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या... कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा... ****************** (पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.) धरितो तुज माझ्या बाहूंत बाळ राजा रक्षितो, जगी पीडा बहूत बाळ राजा झुंजतोस तू भवजलौघे बाळा माझ्या कडेला ये तू विसावा घे बाळा माझ्या क्लांत जधी मी शांत तू करी माझ्या राजा शक्ती दे तू, धीर मी धरी माझ्या राजा *******************

एक रात्र..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 22/09/2007 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. एक धुंद रात्र सख्या मी होते बावरी सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... - प्राजु.
Taxonomy upgrade extras

ठाकुर भले बिराजे

लेखक जगन्नाथ यांनी शुक्रवार, 21/09/2007 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते. हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?

तरच मग कविता कर...

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 20/09/2007 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
जपून वापर जरा शब्द करू नकोस उधळमाधळ उडून जातील कस्पटासमान घोंगावेल टीकेचे वादळ मनातल्या प्रतिमांना ओत साच्यात जरा जपून झिजत चाललेत कंगोरे तीच तीच कविता करून निसर्गाची हाक तशी अधूनमधून कानी येते सतत बोलावणे आले तर औषध घेणे भाग पडते तसे तुझे होऊ नये म्हणून सांगतो दम धर फारच दाटून आले असेल तरच मग कविता कर अत्त्यावश्यक सूचना - १. फारच दाटून आल्याने हे विनोदी शीघ्रकाव्य केले आहे. तेंव्हा ह.घ्या. २. कविता विनोदी आहे हे सांगितले आहेच. तेंव्हा जमेल तेवढे हसावे ही विनंती. ३. माझ्या यापुढील कवितांना याच कवितेतील ओळी फेकून मारू नयेत.:):)
Taxonomy upgrade extras

और एक

लेखक अप्पासाहेब यांनी गुरुवार, 20/09/2007 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
घाल झिम्मा , खेळ फुगडी, धु लुगडी सुंदरीची खा पिझ्झा, चाव चिज, झोक वाईन ईटलीची घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची काट पत्ते, हाण गुद्दे, कर बर्बादी सगळ्यांची ह्याला पोचव , त्याला नागव , धर डुक विषारी घाल खिशात, भर ब्यांकत, चेप माल सर्कारी ह्याची पेटव , त्याची खाजव, खेच टांग नानाची ह्याला दाब , त्याला चोप, कर एन्काउंटर मुड्द्यांची काप बकरं, मुर्गाळ मुंडी , लाव भांडणे जातीची आज साळा, उद्या क्वालिज , मार शिट्टी ईद्येची काल साकर , आज वाईन, येसीझेड हाये उद्याच्याला ह्याची आयात, त्याची निर्यात, किरकेट चा पैका दावणिला माप अल्याड, मोज पल्याड, कर लौबी बिल्डरची घे फावडे , हाण कुद्ळ, जिमीन आपल्

ही धार पहिलटकरीण ...

लेखक अप्पासाहेब यांनी गुरुवार, 20/09/2007 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला काल ठेविला तो 'ओपनर ' कुठे रे गेला गलासात आज माझ्या ओतु नकोस सोडा चखण्यात मात्र घाला कांदा अजुन थोडा अंड्यास कोंबडीच्या सोली हलकेच आता फर्साण शेवगाठी अन बोंबिल भेळ भत्ता सलाम आन्टीला तो, जल्लाद फार्मुल्याला घोट एकुलाच जिर्ता , आत्मा फरार जाला नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा (च्यामारी , आपल्याला बी जमतयां की )

ती सांज रंगलेली

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 19/09/2007 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
ती सांज रंगलेली धुंदीतल्या क्षणाने चोरून प्रीत नेली ओठातल्या स्मिताने वारा उनाड वाहे उडवीत कुंतलाना नजरेस रोखलेल्या स्वप्नास झाकताना काठावरी झर्‍याच्या एकांत स्वर भुकेला तरुसावल्या सलीली निशःब्द सोबतीला हातात हात दोन्ही गुंफून बोलण्यास ते ओठ विलग होती शब्दास शोधण्यास परिते मुकेच राहे पहिलेच प्रेमगान डोळ्यात धृवपदाच्या ओळी निळ्या लिहून सोडून कर कधी ती गेली मला कळेना तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras