Skip to main content

कविता

एक दिवस...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/12/2007 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास...

सोडुन गाव मी माझा ...

लेखक मनोज यांनी शुक्रवार, 14/12/2007 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
सोडुन गाव मी माझा उडून आलो यैसा पश्चिम स्वप्न उराशी अन डोळ्या समोर पैसा प्रफुल्ल रान ते हिरवे अन २० घरांची वाडी विसरून पार ते गेलो भरधाव हाकतो गाडी बेधुंद रांगडा पाउस कस्तुरी गंध मातीचा ते हरवून बसलो सगले आवडे श्वास येसीचा त्या पारावरच्या गप्पा जोश्यांची सुन्दर पारू मिटउन टाकले सारे जोडीला डिस्को अन दारू ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी

दारू एके दारू... :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/12/2007 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
दारुचा पाढा! दारू एके दारू, बैठक झाली सुरू दारू दुणे ग्लास, मजा येई खास! दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन! दारू चोक बियर, टाका पुढचा गियर! दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला! :) एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे. आपला, (ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.

विसरून जायचे तुला

लेखक मनोज यांनी गुरुवार, 13/12/2007 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
*(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी) विसरून जायचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेच घेतो कळते माला ही सारे साराच भास आहे समजाऊ कसे मनाला कसली त्या आस आहे डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी विसरून जायाचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेचा घेतो....

नळ आणि सुंदरी

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 13/12/2007 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
नळावरच्या लायनीत काल जावच लागलं पुरषासारखा पुरुष असुन .. त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी र्‍हाली तीचं करुन करुन माय कमरंत वाकली आज मग बाबुला उदबत्या विकाया धाडलं आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं इतक्यात ती समोरुन जणू तरंगत आली... मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता.. सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत... हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळलं व्हतं... पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता.. काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला हो
Taxonomy upgrade extras

घरटे..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 13/12/2007 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
घर ते माझे बालपणीचे रंगबिरंगी आठवणीचे.. आईबाबांच्या पंखाखाली मांडलेल्या भातुकलीचे.. प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी वेल जुईची बहरली होती.. सैरवैर त्या अंगणी माझी इवली पाऊले नाचली होती.. झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. एकेक पायरी यशाची ती चढले ज्याच्या बळावरी.. घर ते माझे उभे पाठीशी उनपाऊस घेत शिरी.. कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी
Taxonomy upgrade extras

कमळाबाई

लेखक चित्तरंजन भट यांनी सोमवार, 10/12/2007 16:27 या दिवशी प्रकाशित केले.

कर्नाटकची राणी व्हाया  हरखुन गेली कमळाबाई;
मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !


पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--
'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाई


ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !


बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;
साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाई


धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या

उन्हाळ्यातले थेंब (हायकू)

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 29/11/2007 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यातले थेंब (तिहेरी तिहाई)
* तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची * * *
* * लाल धूळकण वाहातायत सैरभैर खार तुषार * *
* * * ऊन धुळीत थेंब कोळपली पालवी वाफवून मलूल करतात *
* दवाचा एक बिंदू पानाला लोंबतो तसा जड नाही तो * * *
* * मागे ठिबक ठिबक समोर
Taxonomy upgrade extras

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 28/11/2007 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.