Skip to main content

कविता

आनंदयात्री..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/01/2008 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री

"मैफिल"

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी सोमवार, 21/01/2008 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
हे तिचेच काव्य सारे ही तीचीच कविता मांडतो मैफिलीत आठवणींच्या मीच वक्ता मीच श्रोता होते माझेच स्वप्न खोटे कुणाचा राग कशास धरावा गाळुनी असहाय आसवे चार मैफिलीचा बेरंग कशास करावा येणार नाही ती हे ज्ञात असुनी वाट तिची पाहण्यास्तव जगतो रात्री चिंब भिजलेल्या पापण्या जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला तिच्याच आठवणीत चिंब भिजतो अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे मैफिल आयुष्याची रंगवतो

गद्य्-काव्य

लेखक वेडा यांनी रविवार, 20/01/2008 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 19/01/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.
Taxonomy upgrade extras

प्रेम

लेखक raje1981 यांनी शनिवार, 19/01/2008 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...

" निरंतर "

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शुक्रवार, 18/01/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
विसरुन सर्व गेले इतक्यात लोक मजला ह्रदयी कधी जयांच्या मी वस्ती करुन होतो.. कोण राहीले निरंतर येथे हे मलाच का ऊमजेना अस्तित्व पुसुनी जाण्याची का मी भिती धरुन होतो.. बांधती जीवा ह्या अजुनी चार धागे त्या विश्वासाचे धावतात शरीरामधुनी वेग बनुनी ते श्वासांचे.. आहेस तु सन्निध स्वरसाज बनुनी ह्या गीताचा जाणवे आधार अजुनी त्या समर्थ हातामधल्या हाताचा.. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..

" एकान्त "

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शुक्रवार, 18/01/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी.. मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी.. मनात वाजत राही आठवणीचा पावा.. वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा.. नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी.. ओठावरती येते तरी का जुनीच विराणी.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..

" सखी "

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शुक्रवार, 18/01/2008 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची साथ तू . . वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . . दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . . संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . . सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . . मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . . काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . . गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . . सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..

विरोप

लेखक अनिला यांनी शुक्रवार, 18/01/2008 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा टिचकीने एका ताव मिळे लिहाया @च्या गोलात पत्ताही दडे नेमका टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे अक्षरेही घेती आकार रंग निराळे मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी टिचकीने एका क्षणात तुजला धाडी पावली लगोलग मज रे पोच पावती भासली जणू रे तुझीच ही सावली या कृती जरी असती यांत्रिक तावातिल शब्द सुवासिक मंत्रित मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित तुज होईल का रे आशीच ही लागण उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तव पत्र पहाया झाले मी अधिरा
Taxonomy upgrade extras

किनारा..

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी गुरुवार, 17/01/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा.. लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा.. किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी.. पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...