Skip to main content

कविता

फासले ऐसेभी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 07/02/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गझल फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था ..... सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!! वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू...... मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था..... रात भर उस ही की आहट कान में आती रही...... ....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था...... अक्स तो मौजूद थे पर .....

तुझ्या भावनांची शपथ आहे (कविता) - सागर

लेखक सागर यांनी गुरुवार, 07/02/2008 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या भावनांची शपथ आहे नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही आज तू मला रोखले आहे नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही आज तुझा आधार आहे नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही म्हणूनच सखे, आपला संग आहे तुझ्या असण्याची मला किंमत आहे नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ... - सागर ०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.

वाद्यं

लेखक नन्दु यांनी बुधवार, 06/02/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
वाद्य आता जेव्हा कधि तो वाद्यांच्या दुकानासमोरुन जातो नेहमि खालमानेने जातो हि सगळी वाद्यां त्याच्या घरात आहेत कधिकाळी.................. तो विचारित आसे वीणेचि किंमत अलवार पणे फिरायचा त्याचा हात ताराना झंकारत नि त्याला वाटायच वाद्यं नसतात त्याचि जो केवल खरिदतो त्याना ती असतात त्याचि जो निर्माण करतो अनाहत सुरवटि आणी मग एका संध्याकाळी त्याच्या घरी वीणा आलि कितीक सांजवेळा,कितीक रात्री कित्येक दिवस उलटले थकून ...वैतागुन.....

कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 05/02/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरचा कोल्हे वाणी पोलादपूरला सोले आणी! सल्ला सच्चा सोळा आणे सोलापूरला पोलाद नेणे
Taxonomy upgrade extras

तिचे अभंग, तिची गाथा

लेखक नंदन यांनी मंगळवार, 05/02/2008 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठावे | सुसाट सुटावे | ऑफिस गाठावे | कैसेतरी || इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या | वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या || चढावे बशीत | गर्दीत घुशीत | रोज या मुशीत | कुटताना || धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम | गाठण्या मुक्काम | सोस बये! || उशीर अटल | चुकता लोकल | जीवही विकल | संभ्रमित || लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे?
Taxonomy upgrade extras

आजही मला ते सर्व आठवतय

लेखक धमाल मुलगा यांनी मंगळवार, 05/02/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजही मला ते सर्व आठवतयं जणू कालचं सारे घडल्यासारखं तीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही मला आठवतंय.... Lecture ला दांडी मारुन बाजुचा परिसर फिरत बसायचो फिरुन कंटाळा आला की परत college कडे वळायचो Canteen वाल्याला शिव्या घालत बाहेरच्या café मध्ये जायचो Café बंद असला की परत Canteen मधलंच येऊन गिळायचो Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Canteen समोरच असल्याने Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत आमच्या group ला मात्र मुलींची तशी allergy होती कदाचीत college कडून ती आमच्या group ला झाली होती चालु तासाला मागच्या बाकावर Assignment copy करायचो ज्याची copy केली आहे त्याच्या

लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 05/02/2008 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र अ अ अनशापोटी आ आ आवळा खाल्ला इ ई इथे बसलाय्? उ ऊ उड्या मारतोय्? ए ए एकदा सांगून ऐ ऐ ऐकत नाही! ओ ओ ओरडतोय् औ औ औषध द्याला - अं आं आंबटशोक अ: आहा आंगलट आला! छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!
Taxonomy upgrade extras

संध्याखंत

लेखक नंदन यांनी रविवार, 03/02/2008 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :) "गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत
Taxonomy upgrade extras

व्हॅलेंटाईन्स डे....

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/02/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

झांज..

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 01/02/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras