Skip to main content

कविता

पाऊस

लेखक निलम बुचडे यांनी शनिवार, 20/08/2016 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'... टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं.. त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले.. त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य...  हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना...  अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........   ----  पाऊस ---- असा वेडा हा पाऊस, करी उगाच वर्षाव.. मन गेलं हे सुकून, होतो खळखळाट फार... त्याच्या ढगांची ती शर्थ, येती दाटूनीया फार.. त्याला नव्हते माहित, येथे वारा नाही फार.. मन कुजूनी जाईल, तुझ्या अतिवृष्टीने...
काव्यरस

वाट वेगळी तिथेच नक्की झाली

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 15/08/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
जगात साऱ्या ओळख पक्की झाली या देशाची खूप तरक्की झाली हाती मोठे घबाड आल्यावरती नियत आपली चोरउचक्की झाली दोन दिशांनी आलो होतो आपण वाट वेगळी तिथेच नक्की झाली दाणादाणा जमवीत आली जनता: पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली पाउल माझे तेव्हा चुकले आहे नजर तुझी जेव्हाही शक्की झाली डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

आयुष्य

लेखक अभिषेक पांचाळ यांनी रविवार, 14/08/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं - अभिषेक पांचाळ

सुखासन

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 12/08/2016 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
आले कोण गेले कोण कवतुक आता वाटत नाही , कुणी थांबले हसून बोलले मनात किणकिण वाजत नाही , पानाफुलापक्ष्यांसाठीही दार सुखाचे उघडत नाही . . . इतके माणूस छिलून निघते एकांताच्या सुखासनावर! -शिवकन्या

कोणते माझे वतन होते

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 11/08/2016 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

एक अतूट नातं

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 10/08/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र आणि मी एक अतूट नातं शब्दांच्या अलिकडचं.... भावनांच्या पलीकडचं... समुद्र आणि मी एक अतूट नातं भरतीच्या लाटांचं ते उचंबळून येणं नात्यातली गुंतवणूक वाढवून जाणं समुद्र आणि मी एक अतूट नातं खिन्न मनाने आकाशात टक लावणं तेव्हाच नेमकं ओहोटीचं मन स्पर्शून जाणं समुद्र आणि मी एक अतूट नातं अनेक आयुष्य त्याने सामावलीत स्वतःत अनेक नात्यांची आंबट-गोड चव .....माझ्या मनात म्हणूनच जाणवतं त्याचं माझं एकत्व समुद्र आणि मी एक अतूट नातं
काव्यरस

माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

लेखक आदिती @ यांनी बुधवार, 10/08/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा सांभाळून घ्या ३ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जेव्हा चेपुवर दुसऱ्याच्या नावाने लिहिलेली भेटते तेव्हा खूप वाईट वाटत. माझी ही कविता थोडे शब्द बदलून मला चेपुवर वाचायला भेटली होती. याआधी लिहिलेली कविता तुम्ही वाचलात, तुम्हाला आवडली म्हणून म्हटलं आपली जुनी डायरी काढून त्यातून उरलेल्या कविता पण इथे टंकाव्यात. शब्दात नाही सांगता येणार डोळ्यातून समजून घेशील ना? अस्वस्थ होईन मी जेव्हा धीर मला देशील ना?
काव्यरस

माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

लेखक आदिती @ यांनी बुधवार, 10/08/2016 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा सांभाळून घ्या ३ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जेव्हा चेपुवर दुसऱ्याच्या नावाने लिहिलेली भेटते तेव्हा खूप वाईट वाटत. माझी ही कविता थोडे शब्द बदलून मला चेपुवर वाचायला भेटली होती. याआधी लिहिलेली कविता तुम्ही वाचलात, तुम्हाला आवडली म्हणून म्हटलं आपली जुनी डायरी काढून त्यातून उरलेल्या कविता पण इथे टंकाव्यात. शब्दात नाही सांगता येणार डोळ्यातून समजून घेशील ना? अस्वस्थ होईन मी जेव्हा धीर मला देशील ना?
काव्यरस

गोदो आला गोदो आला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 10/08/2016 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गोदो आला गोदो आला खेळखेळणी घेउन आला गोदो आला गोदो आला अहा हर्ष तो मनी दाटला! गोदो आला गोदो आला कसा दरबार पाहा सजला स्वागत करण्या एक गलबला हरहर गोदो निनाद झाला गोदो आला गोदो आला ओवाळावे पटकन त्याला भेटवस्तु द्या माणिकमोती त्रिशुलतलवार बरछ्याभाला गोदो आला गोदो आला जो जो बोले कुजबुजवाला कोल्ह्यांची ती ऐकून कुई हरिण बोलले सिंहच आला गोदो आला गोदो आला हिरवी राने हिरवा पाला दुधात न्हाले गोकुळ सगळे आनंदी त्या गोकुळबाला गोदो आला गोदो आला जलौघ वाहे अरण्यातला तूतीवरचा रेशमकीड़ा खुशीत आला अन् वळवळला! गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो

प्रश्न

लेखक इना यांनी बुधवार, 10/08/2016 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेचं आलीस आयुष्यात वाऱ्याच्या झुळूकीसारखी मनात मात्र माझ्या वादळासारखी राहिलीयेस तुझं हसणं, तुझं दिसणं कोरलय माझ्या अस्तित्वावर रात्रीच्या आकाशात ध्रुव चमकत रहावा तसा गुणगुणत राहतो तुझा आवाज माझ्या कानात त्या क्षणी जवळ असतीस तर मिठीत घेतली असती तुला किती आवडतेस तू मला मीही सांगितलं असत मग पण नाही सांगता आलं तेव्हाही आणि आताही आता फक्त स्वप्नं पाहतो त्या स्वप्नातही तू भेटतेस तेही दूर जाण्यासाठीच मग भेटतेस तरी का ते तुलाच माहीत तुझ्याचंजवळ हरवून आलोय मी स्वतःला बेमालूमपणे पण तुझ्या नाही येतं लक्षात आणि माझ्याजवळ असलेला मी अजूनच अगतिक होतो पण यातलं काहीही तुला कळून उप