इतक्या सहज नसतं शक्य...
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय…
आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय…
तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही…
हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही…
प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत…
प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत…
म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या…
नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या…
मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ..
मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ..
मिसळपाव