पटलं तर व्हय म्हणा ! !
आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे,
‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’
कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली.
बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे.
आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ.
बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही !
आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’
पण बाबा ठाम.
मिसळपाव
गोष्ट तशी ८ वर्षापुर्वीची. मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची, त्याचा हा नेहमीचा टाईमपास.
डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत अडकलेल्या एका जहाजेवर २००६ साली पोसायडन नावाचा सिनेमा आला होता. विजय आणि इतर काही मित्र सोबत रात्री ६-९ चा शो पाहून आलो. होस्टेल च्या खिडकीतून माझ्या रूम वरून मी बघितले तर विजय ४-५ मित्रांना सोबत घेऊन काही सांगत होता.