पुण्यात काम करणाऱ्या "खेळघर " या संस्थेविषयी….
प्रिय मित्र,
सप्रेम नमस्कार.
पालकनीती परिवाराचे खेळघर वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे.सलगअठरा वर्षं, अनेक आव्हानांशी सामना करत खेळघराचं काम उभं राहिलं, पुढं गेलं. या वाटचालीत आपल्यासारख्या मित्र परिवाराचा फार मोठा वाटा आहे.
आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगरयेथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतील शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत.
मात्र हे काम लहानशा गटाचं आणि एकाच झोपडवस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही.
मिसळपाव