Skip to main content

मांडणी

काही दुवे...... आज एवढेच

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 31/08/2013 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
१) टंकलेखन आणि संगीत हे मिश्रण भुवया उंचावणारे आहे. आज मी इथे एक लिंक देतो आहे ज्यात एक मोठ्या सिम्फनीने टंकलेखकाचा वापर संगीत तयार करण्यासाठी केला. अनेक वेळा मी यु ट्युबवर काही गंमतीशीर पाहायला मिळेल म्हणून मुशाफिरी करत असतो (गमतीशीर पण सभ्यही!!) त्यात मला हा ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला आणि तो मला आवडला त्यातल्या मुझिक पीस तसेच वाजवणारे आणि typist (!!!???)ह्या दोघांचेही एक्स्प्रेशन्स फारच छान वाटतात. एके काळी मला आठवतंय टंकलेखक आणि शिवणाचे मशीन दोघांनी अनेकांच्या संसाराला आर्थिक हातभार लावला.

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/08/2013 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 10/07/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स, हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे.

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन

लेखक सुधीर यांनी रविवार, 30/06/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्‍याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

मनरक्षिता (२)

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 25/06/2013 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनरक्षिता (१) चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला. तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला.

सावधान........

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 21/06/2013 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली ..... एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही.. सावधान....... सावधान....... सावधान.......

(जंगलातला) आजोबा !!

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 16/06/2013 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.