Skip to main content

मांडणी

डोंबिवली दिवाळी कट्टा वृत्तांत

लेखक नानबा यांनी मंगळवार, 19/11/2013 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज होणार, उद्या होणार, होणार की नाही अशा अनेक विषयांमुळे बराच चर्चिलेला डोंबिवली दिवाळी कट्टा अखेर झालाच. वृत्तांत वाचून कट्ट्याचा आनंद घेऊ इच्छीणा-या आणि काही कारणास्तव येण्याचे मनात असूनसुद्धा येऊ न शकलेल्या तमाम मिपाकरांसाठी हा वृत्तांत.. अखेरच्या क्षणापर्यंत कट्टेकरी मंडळींची पक्की संख्या तळ्यात मळ्यात होती. माननीय चोळेगावकर श्री. स्पा यांनी आधीच नकार कळवला होता, तर रविवार रात्रीची वेळ असल्यामुळे डोंबिवली बाहेरील अनेकांनी येणं टाळलं. साधारण ५ जणांचा होकार आल्यामुळे दुपारीच नंदी पॅलेसमध्ये फ़ोन करून टेबल रिझर्व्ह करून ठेवलं होतं.

' माझ्या सासुबै ! '

लेखक जेनी... यांनी शुक्रवार, 15/11/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
" नमस्कार करते हं सासूबाई " कमरेतून जस खाली वाकून पायाला हात लावणार तोच सासू बै नी खांद्याला हात लावून " औक्षवंत हो " असं म्हणाल्याचं कानावर आलं ,मग मी पायाला हात न लावताच डोकं वर घेतलं ,म्हटलं आशीर्वाद मिळालाना ,झालं ना काम .एका हाताने त्यांच्या हातातली ब्याग स्वताहाच्या हातात घेत त्यांना " कश्या आहात? प्रवास व्यवस्थित झाला ना?

HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितातं !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी शनिवार, 09/11/2013 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी हॅरी हार्लो या महान मानसशास्त्रज्ञाचा जन्म १९०५ मध्ये फ़ेअरफ़ील्ड काउंटी आयोवा येथे झाला.याने ग्रॅज्युएशन रीड कॉलेज मधुन पुर्ण केल्यावर हा स्टॅनफ़ोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सीटी त मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.हार्लोने सुरुवातीला लेविस टर्मन या प्रसिद्ध संशोधकाच्या हाताखाली उमेदवारी केली. लेविस हा त्या काळात gifted child मध्ये असलेल्या बुद्ध्यांका वर I.Q.

तरुण तुर्कांनो व ज्येष्ठ अर्कांनो प्रेमकोषा च्या निर्मीतीस योगदान द्यावे ही प्रेमळ विनंती !

लेखक मारवा यांनी गुरुवार, 07/11/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील तरुण तुर्कांनो आणि ज्येष्ठ अर्कांनो प्रेमात पडलेल्या ,पडु इच्छीणारे आजी-माजी प्रेमवीरांनो यंदा च्या दिवाळी ला एक महान मिपा प्रेम-कोष तयार करुन समाजसेवा करण्याचा मानस आहे. की जेणेकरुन भावी आणि सध्याच्या प्रेमी जीवांना एक रेडी रेकनर प्रेम फ़ुलविण्यास, प्रेयसी ला आपले प्रेम पटवुन देण्यास उपयोगात येइल आणि ज्या योगे एक ऐतिहासिक महत्वाचा विश्वकोषा च्या धर्तीवर प्रेमकोष बनु शकेल. याने प्रेम या संकल्पने वर एका जागी सुंदर असे साहीत्य ही जमा होइल. यात आपण उदार हस्ते आपल्या जवळील प्रेम खजिना शेअर करुन प्रेमकोष निर्मीतीस योगदान करावे ही प्रेमळ विनंती !.

१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 03/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास. म्हणजे अस पाहा .

गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 31/10/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली. नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय. अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??! पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं..

अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग २

लेखक गुल-फिशानी यांनी बुधवार, 30/10/2013 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
s Cubism चा प्रभाव आणि त्या बाहेर पडण्याचे प्रयत्न याच काळात एक दुर्दैवी घटना घडली दालीच्या आई चा मृत्यु झाला. आणि वडीलांनी दुसरे लग्न त्याच्या आईच्या च बहीणीशी केले. या घटनेचा खोलवर परीणाम दाली च्या मनावर झाला. मात्र त्याची एकीकडे चित्रकलेत चांगली प्रगती सुरु होती. तो तेथील फ़ेमस Prado म्युझियम मध्ये तासन तास घालवित असे व तेथील युरोपियन मास्टर्स च्या पेंटीग्जचा बारकाइ ने अभ्यास करीत असे.

अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १

लेखक गुल-फिशानी यांनी बुधवार, 30/10/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो !!! सर्वप्रथम एक गोष्ट नम्रपणे नमुद करतो की मी चित्रकला या विषयातील तझ नाही केवळ एक साधा रसिक आहे.

वीर-रसा ने माखलेल्या तीन लालबुंद कविता !!!

लेखक गुल-फिशानी यांनी सोमवार, 28/10/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो ! या माझ्या अत्यंत आवडत्या कविता आहेत. या मनाला छान उभारी देतात. वाचुन बघा कदाचित तुम्हाला ही या आवडतील !

नाही म्हणायला शिका.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 25/10/2013 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला आजवरच्या आयुष्यात अनेक विविध प्रसंगांत वेळोवेळी कधी न कधी तरी "नाही" म्हणण्याचे राहून गेले असे झाले असेल. आपले नातेवाईक, शेजार पाजारी समाज काय म्हणेल या भीतीने वेळोवेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत असतील. तसे बघा यला गेले तर त्याची सुरुवात आपल्या घरातल्या माणसांपासूनच होते असे म्हटले तरी चालेल. पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतो. मुलगा/ मुलगी १ ० पास झाली कि कला, वाणिज्य आणि शास्त्र यापैकी शास्त्र हा विषय घेवून त्याने डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असे वाटते. भले मग तो विषय त्याला आवडो अगर न आवडो किवा त्याला अभ्यास झेपेल/ नाही झेपेल या विषयी त्याचे मत विचारात घेतले जात नाही.जर तो मुलगा/ मुलगी ठामपणे वेळीच नकार देवू शकला, तर आपल्या हव्या त्या विषयात निपुण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.--break--> आज अशी बरीच उदाहरणे आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसतील कि जे पेशाने डॉक्टर/इंजिनियर असून सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. उदा. डॉक्टर काशिनाथ घाणेकर , डॉक्टर सलिल कुलकर्णी, डॉक्टर गिरीश ओक तर मेडिसीन मध्ये उच्च शिक्षण घेता घेता ते अर्धवट सोडून समाजकारणात शिरलेल्या मृणाल गोरे हे एक वेगळे उदाहरण. जे गोष्ट शिक्षणाची तीच लग्नाची. मुले उपवर झाली कि त्यांचे लग्न ठरवताना कित्येकदा पालक मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. काही वेळा धाकाने तर काही वेळा कौटुंबिक परिस्थिती जाण असल्याने मुले/मुली लग्न उरकून घेतात पण मग पुढे संसारात त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. काही जण मग मन मारून नमते घेतात आणि आलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेतात हे जुळवून घेणे म्हणजे काय तर पुढे आयुष्य भर ते "नाही" हा शब्दच कधी उच्चारात नाहीत. तर काहींनी नंतर नाही म्हटल्या मुळे त्यांचा संसार सुखाचा होत नाही. हे सर्व वेळीच "नाही" म्हटले असते तर टाळता आले असते. --break--> या गोष्टीत तर मुलीना तर ती फक्त मुलगी आहे हे मनावर बिंबवून "तू हे करू नको, ते करु नको"असे वारंवार बजावले जाते. आणि मग ती मुलगी पुढे कुठल्याच गोष्टीला विरोध करित नाही.