Skip to main content

मौजमजा

म्हैसमाळ (महेशमाळ)

लेखक बाबा योगीराज यांनी रविवार, 29/08/2010 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और्॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/08/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते: ">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!! खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं >>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१ चला यमकं जमवुया" मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड म्या जवा भेटाया जातो काशीला.... तवा... तवा...
काव्यरस

प्रेमाची बँक

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/08/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? माझे अकाउंट उघडतेस का? माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ|| खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का? तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
काव्यरस

तू तर नागीण!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 27/08/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
"तू तर एक जातिवंत नागीण निघालीस. मला तुझा सर्पस्वभाव नव्याने कळला.. काल तुझी माझी भेट झाली, कदाचित शेवटचीच. या आधीही आपण भेटलोच की. पण कालची भेट बहुदा अखेरचीच ठरणार होती तर.. तत्पूर्वी व्हायचं असं की, तू माझ्या अंगणात यायचीस. मनमोहकशा सळसळत्या मदमस्त चालीत. कधी अवचित, तर कधी ठरवून. त्या तुझ्या नव्या नव्हाळीच्या सावळ्या रुपावर, मनोवेधक गोड शब्दांनी लपलपणाऱ्‍या जिव्हेच्या करामतीवर मी पटकन भाळलो. तुझी आकर्षक बांधणी, मुळचीच तंग धाटणी अन् अंगाची आकर्षक वेढणी मला वेडावून जायची. वाटायचं चला आपणही आता कात टाकावी, तुझ्या निकट जावं, सळसळावं, खेळावं.

(जर्रा खाजवा की)

लेखक सुनील यांनी बुधवार, 25/08/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय आहे मंडळी, आम्हाला प्यायची लै म्हंजी लैच खाज! आता प्यायची खाज आली की, आम्ही कुठलासा दोस्त पकडतो आणि थेट एखादा बार गाठतो. आता अशेच एकदा एका बारमध्ये बसलो असता आमच्या पाठीला लै खाज सुटली! मित्राला म्हटलं, "आता काय करावं?" तो म्हणाला, "मी खाजवू?" मी दचकून ओरडलो, "नक्को...." नुकताच "दोस्ताना" रिलीज झाला होता!!! बरं, तो बार काही साधासुधा नव्हता! तो होता लेडीज बार. सगळ्या वेट्रेस!! मित्राला हळूच विचारलं, "त्यांच्यापैकी कुणाला सांगू?" तो उचकला, "अरे, येडा हाये का?अरे, आपण त्यांच्या पाठीला साबण चोळायचा असतो.

जर्रा खाजवा की

लेखक अनाम यांनी बुधवार, 25/08/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी डोक खाजवा जरा ;) आणि '?' च्या जागी योग्य आकडा लावा बर :) एकदम सोप्प हाय.

आकडा लावा :

;)
१५ १२
२८ २०
४५ ३०
६६ ४२
? ५६

भयंकर षडयंत्र

लेखक सागर यांनी शनिवार, 21/08/2010 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सदर कथा काल्पनिक असून त्याचे कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा. *** वेळेअभावी संक्षिप्त स्वरुपात हे कथानक लिहितो आहे. *** भयंकर षडयंत्र उपोद्घातः फेब्रुवारी १९९८ अफगणिस्थानातील तोराबोरा या दुर्गम इलाख्यातील एक प्रशस्त गुहा आपल्या पॉश सोफ्यावर राजेशाही थाटात पाय पसरुन तो बसला होता. सोनी टीव्ही च्या आलिशान पडद्यावर तो अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्याक्षांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध कसे करते हे तो पहात होता. गेली कित्येक वर्षे तो हे करत होता.