Skip to main content

मौजमजा

वर्षाव

लेखक सन्जोप राव यांनी बुधवार, 18/08/2010 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
कणेकरांचं 'मेतकूट' आणि 'आंबटचिंबट' वाचल्यानंतर या माणसाला लागलेली मृत्यूची चाहूल डोळ्यासमोर दिसते. आता त्यांना दिलीपकुमारचे चित्रपटही पहावेसे वाटत नाहीत, म्हणजे त्यांच्यासारख्या अट्टल युसुफचाहत्याचा हा जिवंतपणी झालेला मृत्यूच. असे दिवसेंदिवस शुष्क होत टप्प्याटप्प्याने मरण्यापेक्षा रसरशीतपणे एकदाच मेलेले काय वाईट? ----------------------------------------------------------------------------- 'मी लहानपणी दूध पीत असे' या वाक्यात 'मी' च्या जागी 'तू' हा कर्ता केला तर हे वाक्य कसे होईल असा प्रश्न आम्ही लहानपणी ज्यालात्याला विचारत असू.

एच आर, प्रोसेस आणि मी

लेखक शुचि यांनी सोमवार, 16/08/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
कॉसकोची वारी म्हणजे तशी म्हतली तर चंगळच असते. भरपूर रंगीबेरंगी गर्दी, हिरव्यागार भाज्या, रसरशीत फळं, मासे , चिकन, पोर्क सगळं मस्त हाताळायला मिळतं ते मिलतं वर नमुनेदेखील चापायला मिळतात. आमच्याकडे साधारण १५वड्याचं, महीनाभराचं सामान या वारीत आणलं जातं. पण दिवाळीनंतर येतो शिमगा त्या न्यायाने कॉसकोच्या फेरीनंतर घरी आल्यावार एक-एक करत ते सामान गाडीतून उतरवायचं, नंतर जीना चढत चढत दारापर्यंत न्यायचं, तिथून पुढे फ्रीजपर्यंत नेऊन लावायचं म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. ४-४ गॅलन दूध, अंडी,फळांचे भाजांचे टोप, मासे, चिकन, चिकन ब्रॉथ चे कॅन्स, केचप्स, सिरीअल्स एक ना दोन.

सामंतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 15/08/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
सामंतांचा काल वाढदिवस होता. ते हल्ली दिसत नाहींत. कुणी म्हणले होते की सध्या अमेरिकेत आहेत. त्यांना शुभेच्छा!

माझे पोहणे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 14/08/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते.. खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण... मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल...

(नाचत नाचत येई परा)

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 12/08/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाचत नाचत येई परा आला फुफाटा निराशा विसरा ||धृ|| सँडल वाजता टकटक टकटक झोत ब्याटरीचे पहाती सरसून स्टुल देई दाखवत कोपरा नाचत नाचत येई परा ||१|| क्याफे अवघा स्वर्ग होईल स्वप्न कालचे सत्य होईल आनंदूनी घेई हलकेच वारा नाचत नाचत येई परा ||२|| लयीत पावले तिची पाहुनी हळुच बघे मान वाकउनी सुर हलका धरुनी हाकारा नाचत नाचत येई परा ||३||
काव्यरस

आनंदी आयुष्याच्या पाककृती - 1 : मिपा कट्टा

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 12/08/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आनंद कसा घ्यायचा ते विसरले आहेत अशी तक्रार जागोजागी ऐकू येते. समृद्धीचे चणे वाढले असले, तरी दात ते चणे खाण्याऐवजी एकमेकांना विचकून दाखवणे, कोणावर तरी धरणे, कराकरा खाणे, स्वत:चाच ओठ चावणे, वगैरे गोष्टींमध्येच गढून जाताना दिसतात. 'थांबा आणि गुलाबांचा वास घ्या' या उक्तीप्रमाणे वागायची इच्छा असली तरी कधी कधी नुसते दुर्गंधीचे भप्कारेच येतात, त्याला आपण तरी काय करणार? त्यात सध्या आयटीने जी क्रांती केलेली आहे, तीमुळे इतकी वर्षं मुकाट्याने काम करणाऱ्या बायकाही आता मारे हपिसात जाऊन चकाट्या पिटून संध्याकाळी नवऱ्याप्रमाणेच थकून भागून आल्याचं सांगतात.

(तिंगुलीने घात केला)

लेखक अवलिया यांनी बुधवार, 11/08/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - लै अभ्यास हवा. लै ! कसा तिंगुलीने असा घात केला शीट* शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की प्रवेश करतो मी अकस्मात पास्वर्ड तिथे चुकलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा दिसु लागे कुणी घुसलेला खुला एकही का, इथे आय्डी नाही आधीच आय्डीत तु प्रवेश केलेला? पटू संगणकाचा, तरी मार खाई म्हणू का नये रे तुला झिंगलेला? प्रवेश होईना, पास्वर्ड घेईना कसा मी स्विकारू एक्सेल्शीटला? "पाध्यांस" चेव आय्डी ब्लॉक कराया असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला बोर्डावर कुठे ................................................... (वृत्त-भणंगप्रयास) * तिंगुलीकडे असलेले एक्सेल शीट
काव्यरस

पुणेरी विक्षिप्तपणा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 11/08/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.