Skip to main content

मौजमजा

गीत: डायवर दादा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 16/06/2010 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
डायवर दादा
डायवर दादा चला की आता कशाला पब्लिक जादा घेता डब्बल वाजली आता तरी तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||धृ|| रेटारेटी करतात सारी गर्दीत बाईमाणूस एकटी तरी बसायला जागा कुठं शोधू आता तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||१|| कोरस: "ह्यो डायवर गाडी काय पुढं नेत न्हाई, उगा वेळ होई, मुडदा बशीवला त्याचा म्होरल्या कामाचा इस्कोट झाला, गर्दीचा महापुर आला, लवकर हाण म्हणावं गाडी त्याला" कंडक्टर भाऊ लांब उभा मागं "सरका पुढं, सरका पुढं ", वरडू लागं गर्दीत पाकीट कशी काढू आता तुम्ही

बरसात की रात!!

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 14/06/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
बरसात की रात!! जिंदगीभर नही भूलेगी वो .... आम्ही दोघेच...अंधाराच्या गाभाऱ्यात... भुरुभुरु पावसाची हलकीशी सर... ओलावलेल्या पानांची मंद सळसळ....गारव्याची झोंबाझोंबी... आनंदाची शिरशिरी... कोण बोलले... काय बोलले... याची तमा कोणाला... हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले... ती रात्र... ती जागा... ती ती... मनात कायमची घर करून गेली... आठवणीचे मनोरे चढत गेले...

(नको तेच झाले)

लेखक चेतन यांनी सोमवार, 14/06/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा क्रांतीताईंची सुंदर गझल नको तेच झाले असो... विरझण घाली; असेही, तसेही जरी फोल दावे; असेही, तसेही जरा बोलता तो; विरोधात काही युसलेस बोले; असेही, तसेही किती बरळावे? मुल्य लेखनाचे माकडे टंकती; असेही, तसेही उडे लेखनही, न लावता काड्या पुरावेच देई; असेही, तसेही फुका बोलबाला स्थळपालटाचा, इनो फार झाले; असेही, तसेही कशाला निमित्ते हवी भांडण्याची? कंपुबाज सारे; असेही, तसेही काव्य कर्तनाने पडे फरक का? विडंबन पाडे; असेही, कसेही अवांतर सुचना: व्रुत्त आणी व्याकरण अर्धविराम तपासत बसु नये बसलात तरी मला काही फरक पडत नाही
काव्यरस

भेट तिची माझी

लेखक अरुंधती यांनी रविवार, 13/06/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून? मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले. आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे.

डाळिंब सोलण्याची कला

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 13/06/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
डाळिंब व्यवस्थित सोलणे हे मनीचं गूज खोलण्याइतकंच कठीण काम असतं. मधुमिठास बोलणे काय किंवा इच्छित निसरगाठी खोलणे काय दोन्ही गोष्टी एकाच पाटातून वाहणाऱ्‍या! त्या वाहत्या, खळाळत्या प्रेमजलात (किंवा जालात म्हणा हवं तर) संबंधित प्रेमीजन कसे-किती-कोठवर वहावत जातील याचा अंदाज भल्याभल्यांनाही येत नसतो. पाटाने वहिवाट मोडल्यावरच भानावर येणं होतं! तद्वत डाळिंब सोलण्याअगोदर आत काय दडलंय? टिप्पूर दाणे आहेत की नुसताच भुललासी वरलिया रंगा असा प्रकार आहे, याचा अदमास ना चाकूला असतो ना काकूला. डाळिंब विक्रेती काकू कितीही म्हटली की ते झाडावरच टचकन् फुटलंय, यावर पटकन विश्वास ठेऊ नये बंधूंनो.

लहानपणच्या आठवणी

लेखक वेदश्री यांनी बुधवार, 09/06/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बेट्या, आता तू मोठा झालास. आता वेगळ्या ताटात जेवत जा." मी लहानपणी तिसरीत जाईतो बाबांच्या ताटात जेवायचे. यामुळे त्यांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणाला आळा बसायचा त्यामुळे ते करवादायचे पण लहान लेकराला काय म्हणा म्हणून असा क्षीण प्रयत्न करायचे. "पुढच्या वर्षीपासून जेवत जाईन वेगळ्या ताटात. अजून मी छोटीच आहे." बागेत जाऊया, सर्कस बघायचीये, नवे बूट घ्यायचे वगैरे म्हटले की बाबांचे "पुढच्या वर्षी" हे उत्तर इतके ठरलेले असायचे की तेच उत्तर माझ्या तोंडून बाहेर पडल्यास नवल ते कसले? ~~~ बाबांच्या हापिसात बसून त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याची मला कायम हौस.

विलोभनीय नायगरा!

लेखक मीली यांनी शुक्रवार, 04/06/2010 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता ! शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना!