Skip to main content

मौजमजा

बम बम.......

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 15/05/2010 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्पॉयलर अ‍ॅलर्टः ज्यांना बम बम भोले नावाचे प्रकरण पाहायचे आहे त्यांनी ही पोस्ट वाचू नये. लालबाग परळ पाहायला गेले होते. मध्यांतरात बम बम भोले चा ट्रेलर दाखवला.. प्रेरणा सांगायची गरज नव्हतीच.. दाखवलेल्या त्या एक दोन दृश्यातच मूळ चित्रपटातले शेम टू शेम संवाद नि फ्रेम टू फ्रेम चित्रिकरण पाहून डोकं फिरलंच... आज परीक्षा नि त्यानंतरचं सगळं सबमिशनचं मेन मिशन संपल्यावर टीपी करायचा मूड आला.. नि म्हटलं, चला.... जाऊन त्या बमबम भोलेच्या नावाने शंख करून येऊ.

'तो'

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 12/05/2010 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
दादरला झालेल्या मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याला हजर राहून मी वाशीला घरी परतत होतो. शिवाजी पार्कहूनच निघणारी बस पकडली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर स्थानापन्न झालो. शेजारी माझ्याच वयाचे एक गृहस्थ येऊन बसले. बेस्टच्या बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाबरोबर बोलायची पध्दत नाही. एकाद्या सीटवर आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकू आलेच तर त्या बहुधा आपापल्या सेलफोनवरून निरनिराळ्या लोकांशी बोलत आहेत असे दिसते. माझे तिकीट काढून झाल्यावर मी सुध्दा आपला मोबाईल काढला आणि त्यावरची बटने दाबायला सुरुवात केली.

द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

लेखक जीएस यांनी सोमवार, 10/05/2010 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
चेतन भगतला सिरिअसली घेणारा एक लेख वाचून राहवले नाही, म्हणून मा़झा त्याचे एक पुस्तक वाचण्याचा जुना अनुभव देत आहे... चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त.

हळू हळू...चालव तुझी फटफटी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 07/05/2010 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू...चालव तुझी फटफटी तुझ्या मागे बसायची वाटत नाही भिती तरीही तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी ||धृ|| घरी न बोलता आले निघून केवळ तूझ्या सांगाव्या वरून कॉलेजला जाते खोटं बोलता घरी संशय न कसला आता मोकळी झाले मी, न पाठी कटकटी ||१|| आता तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी तोंड झाकले रुमालाने रे न चेहेरा दिसे माझा कूणाला बापही जरी आला समोरी तो न ओळखी मला आता घाई कशाला, नको त्या कसल्या लटपटी ||२|| म्हणून तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी आडव्या तिरप्या रस्त्यांनी जावूनी फिरव मला सारे गाव ओळख
काव्यरस

मै ऐसा क्यूं हूं?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 03/05/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :) बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं.

फुकट वेळ असला की हे असं होतं...

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 30/04/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
किती दिवस झाले मुखपृष्ठावरचा डावीकडचा 'लेखन करा' टॅब खुणावत आहे! आज मात्र मी मनावर घेतलंय. आज मी काहीतरी लिहिणारच! एखादा वैचारिक लेख लिहावा लिहावा असं कधीपासून मनात होतं. मीही विचारवंत होणार! मीही काहीतरी अर्थपूर्ण लिहिणार.. माझ्याही लेखावर प्रतिसादाच्या खिरापती वाटल्या जाणार!! केवळ विचारानंच बघा कसं गारगार वाटतं! मग एका क्षणात भावी विचारवंताच्या मनाला एक विचार हलकेच स्पर्श करून जातो.. कशाला इतका तो प्रपंच? वैचारिक लेख लिहिणं म्हणजे काय विचार करण्याइतकं सोप्पंय होय? शिंप्याने कपडे शिवावे- ते त्याचं काम, धोब्याने ते धुवावे.. ('ते' म्हणजे कपडे..

नैनिताल : एक काकडलेला अनुभव

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 29/04/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर..... बर्‍याच वर्षांपूर्वी केलेला माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता. परवाच एका वर्गमित्राने ओर्कुटवर त्या प्रवासाचे व सहलीचे काही फोटोज अपलोड केले आणि ते पाहिल्यावर मनात त्या सहलीच्या स्मृती रुंजी घालू लागल्या. महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो.