Skip to main content

मौजमजा

IPL प्रवेश परि़क्षा

लेखक नितिनकरमरकर यांनी शुक्रवार, 19/03/2010 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या IPL चा जमाना आहे. हळूहळू हे प्रस्थ वाढतच जाणर, क्रिकेट येण्या बरोबरच नविन "रिक्रुटांचा" IQ तपासण्याची गरज भासू शकेल ती परिक्षा अशी असू शकेल. १. इंग्लंड मधे कोणती भाषा बोलली जाते? २. हडप्पा संस्क्रुती मधिल वास्तुशास्त्र, कला या वर चर ओळी निबंध लिहा. किंवा सचिन तेंडुलकर चे आडनाव सांगा. ३. पु. ल. देशपांडे खलिल पैकी कश्यासाठी प्रसिद्ध आहेत, अ. वास्तुशास्त्र ब. क्रिकेट क. लेखन. ४. पोप कोणत्या धर्माशी संबधीत आहेत, अ. हिंदू ब. मुस्लिम क. यहूदी ५. ०.० मीटर म्हणजे किती फूट? ६. तुम्हाला न्युटनचा पहिला सिद्धांत माहित आहे का? अ. होय ब. नाही. ७.

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 15/03/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात. पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र!

एक टुमदार गाव - माझे माधवनगर - भाग - २.

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/03/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव माझे माधवनगर - सन १९६० ते १९७० दसकातील आठवणी भाग - २.
मागेवळून पाहता कधी आठवतात मजेशीर गोष्टी ... बुधवार पेठेत स्वर्गात न्यायाला विमान येणार म्हणून पत्रके वाटून मोठी तयारी केलेले श्रद्धाळू जाखोटिया... त्यांचा भसाड्या नाकाचा राजा... रेल्वे स्टेशनच्या पलिकडील सुंदर विठ्ठल मंदिरात हभप वासुदेवराव जोशींची टाळ मृदुंगाच्या तालावर होणारी हरिपाठाच्या अभंगांवरील कीर्तने... त्यानंतर नातू शेठजींचे ‘इष्टी’ कथन... त्यात बालगंधर्वांचे भजन गायन... ६७ सालातील भुकंपानंतरची रात्र... चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री 2 ते 4 गस्त घालण्याची कामगिरी...

जरा डोकं चालवा

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 14/03/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
डोकं चालवा अमर,अकबर,अँन्थनी हे तीन मित्र जंगल भटकंतीसाठी निघाले.अमरच्या आईने तिघांसाठी वाटेत खाण्याकरीता लाडू दिले. लाडू खातेवेळी त्याचे तीन समान भाग करून खा अशी स्पष्ट ताकीदही तीने सर्वांना दिली. अमर,अकबर,अँन्थनी जंगल भटकंती करत करत एका झाडाच्या सावलीत थांबले. गप्पा मारता मारता त्यांना झोप लागली.अमरला झोपेतून जाग आली तेव्हा त्याला खूप भूक लागली होती.त्यांने लाडूचा डबा उघडला .डबा उघडतांना त्याला आईचे शब्द आठवले ‘तीन समान भाग करून खा ‘ त्याने डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले.आपला वाटा खाऊन टाकला.

गुलाबाचा महिमा

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/03/2010 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. म्हणजे नाव एकच पण प्रत्यक्ष फुलं अनेक. (आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला आयडी अनेक पण व्यक्ती एक हा प्रकार माहीत आहे. तर त्यावर आधीच उत्तर म्हणूनच तात्यांनी आयडी एकच (जवळपास) आणि व्यक्ती अनेक (जवळपास) हे उदाहरण दाखवलं असावं.) हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी.

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 08/03/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;) असो... इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते: १. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.