Skip to main content

मौजमजा

रेडिओ

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 29/03/2010 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
रेडिओ
लहाणपणी मला पडायचा एक प्रश्न असतील का रेडिओमधील माणसं सुक्ष्म? असतील ही माणसे आपल्यापेक्षा वेगळी एकत्र बसून वाजवतात वाद्ये सगळी एकतर रेडिओचा आकार छोटा गायक, वादक, तबला, पेटी, वाद्ये इतर पसारा केवढा मोठा! खासच असतील ही माणसे एकजात तरीही प्रश्न पडे कशी वाजवतात गाणी एकसाथ? एका गाण्यासाठी लता मंगेशकर येते तिचे गाणे म्हणून ती निघून जाते नंतरच्या गाण्यासाठी किशोर कुमार येतो त्याचेही गाणे म्हणून तो निघून जातो निश्चितच आहे सगळे वेगळे त्याशिवाय का सुरळीत चाले सगळे? हे सगळे प्रश्न मी विचारले माझ्या काका
काव्यरस

मनाचे खेळ!

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/03/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक न असलेल्या अंधऱ्या खोलीतल्या दोन न असलेल्या खुर्च्या. मध्यभागी न टांगलेला दोनशे वॉटचा दिवा न हिंदोळणारा. तिथे उपस्थित न असलेल्यांच्या सावल्या तशाच मंद गतीने न हिंदोळवणारा. त्या खोलीच्या भिंती सहा इंच जाड दगडी (न असलेल्या - आता हे पुन्हा पुन्हा सांगत नाही). एका खुर्चीवरच्या व्यक्तीला खुर्चीला जखडून ठेवलेलं. तिला आपण अ म्हणू. अज्ञात, अनॉनिमस, अविचारी म्हणून... दुसऱ्या, समोरच्या खुर्चीवर तात्या. तात्या तो दिवा फिरवून त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर भणभणता झोत टाकतात. "शेवटचं विचारतो. बोल, कोण आहेस तू?" दुर्दैवाने त्यांना चेहेऱ्याच्या जागी एका गहन काळिम्यापलीकडे काहीच दिसत नाही.

अभिनंदन छोटा डॉन!

लेखक महेश हतोळकर यांनी शुक्रवार, 26/03/2010 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा डॉनच्या ब्लॉगची सकाळने घेतलेली दखल! http://www.esakal.com/esakal/20100325/5160732294887613459.htm * फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा. लगे रहो डॉन भाई. अभिनंदन.

कुंग फु पांडा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 22/03/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो. -- बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी. 'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.

अर्ध्या तासाचा फरक

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 20/03/2010 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!