Skip to main content

मौजमजा

मंडली, म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय. वाचा तर मंग आता.

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/01/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय. हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्‍ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय. जरा जरा दादा कोंडके यांच्या लिखानासारखी हाय. नाय आधीच विचारून घ्येतो.
काव्यरस

२०१०-विजयी भव!!!

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 30/12/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे. माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो.

वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 30/12/2009 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याजवळच सासवडजवळ वीर नावाचे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच कुटुंबांचे वीरचा नाथ म्हस्कोबा हे कुलदैवत आहे. त्या मंदिरापासून जवळच म्हणजे १ किमीवर वीर धरण आहे. सासवडला पाणीपुरवठा याच धरणातून होतो. त्याचा जलाशय आम्हा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्षांसाठी. विशेषतः सायबेरियातून येणाऱ्या "बार हेडेड गीज" (मराठी नाव माहीत नाही) या पक्षांचे हे वीर धरण आश्रयस्थान आहे. परवा तिकडे एक चक्कर टाकली. पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत.

मकरसंक्रांत

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 29/12/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ठाण्याला " मिपाकट्टा " जमला होता . त्यावेळेस मनात असुनही जाता आले नाही. कारण त्यावेळी मी कामावर होतो. आणि काम सोडुन जाणे जमले नाही. त्यावेळी मोबाइलवरुन मी सगळ्यांची विचारपुस केली होती. या वर्षी म्हणजे " मकरसंक्रांतीनिमित्त " पुण्यातील "मिपाकरांना " एकत्र येणे जमेल काय ? मला दि. १७ जानेवारी ही तारीख योग्य वाटते.

भिगवणचे परदेशी पाहुणे

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.

माझे खाद्य-पेय जीवन-४

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 06/12/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः मद्य, मद्यपान व मद्यपी यांच्याविरुद्ध तीव्र आणि टोकदार मते असणार्‍यांनी हे लिखाण वाचले नाही तरी चालेल. मद्यपानाचे मला काही उदात्तीकरण वगैरे करायचे नाही, जे आहे, जे पाहिले, ते सांगायचे आहे, इतकेच. चिअर्स! चहा, कॉफी ही प्रातःकालीन उत्साहवर्धक पेये झाली की इतर पेयांचा विचार सुरु होतो. त्यातली बाटलीबंद शीतपेये तूर्त सोडून देऊ. इतर पेयांमध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत आणि पन्हे हे सरताज. लिंबू सरबतात बारीक वेलदोड्याची पूड आणि बर्फाचे भरपूर खडे असले की ते अधिक चविष्ट लागते. कोकम हे तहान भागवणारे खरे, पण त्यात पाण्याऐवजी थंडगार सोडा घातला तर ते अधिक मादक लागते.

क्यू.पी.एस (QPS) आणि पी.आय.पी (PIP)

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 04/12/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक म्हणायचे, 'असे नाही करायचे. त्याने कॅसेट खराब होते.' मग ह्या कार टेप मध्ये त्यांनी ही सुविधा का दिली?