Skip to main content

मौजमजा

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

आचार्य नाडीनंदाचा माडीबोध -

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/11/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, विसोबा खेचरांनी नाडीऐवजी माडी घालून विडंबनाची प्रेमळ विनंती करून बक्षिसाची चिकनची तंगडी समोर ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले कळले नाही म्हणून हा नवा धागा टाकायचा अगाऊपणा. त्यांना जबरी वाटले ते इतरांनी चघळावे म्हणून पुन्हा डकवण्यची मुभा घेतली आहे.

मंडळ निघालं गोव्याला

लेखक प्रभो यांनी बुधवार, 04/11/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर.... असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात"....

(कवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 04/11/2009 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयींची माफी मागुन हे दु:ख विडंबन स्वतःला कवी समजुन काहीजण प्रयत्न करतात ढापले म्हणु नये म्हणून शब्द बदलतात समोर जे जे दिसेल त्यावर कविता करतात भुक्कड माणसे! पण वाचकांना अर्थ लागतोच असं नाही अथवा डोके बंद करुन लिहित असतो कवी! इथेच सगळी गोची आहे फुलांनी नटलेला वसंत अल्लड हसणारी लहान मुले प्रेम, प्रेमभंग, मन, आभाळ, श्रावण, पाउस अन् वर्षानोवर्षे चालणारे फुटकळ विषय सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा काव्य झालेले असते सजलेले, सजवलेले , व्रुत्ताच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- विषय साधे असतात, कवी चलाख असतो!
काव्यरस

स्वाक्षरीसंदेशगाथा

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 03/11/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली.

(मुक्तिदाता)

लेखक चेतन यांनी शनिवार, 31/10/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण मोडकांची मुक्तिदाता वाचुन हे काही तरी मोडकं तोडकं ;) प्र-भाव, तर्र, बोळा देशी, विदेशी, वारुणी! बालांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही तराठलेल्या डोळ्यांत, जडावलेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, सकाळी दुपारी, संध्याकाळी रात्रीही भरलेल्या मद्यालयात, आभास अन् अस्तित्त्वाचा आसक्त मुक्तिपावक टुल्लतराठ बेवडा
काव्यरस

अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.

लेखक Nile यांनी गुरुवार, 29/10/2009 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो. निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त. भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं. पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा. मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही. (क्रमशः)

तांदूळगड - तांदूळवाडी

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 27/10/2009 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्‍याला दोरखंडाचे सहाय्य लागेल. काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा. डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता.