Skip to main content

मौजमजा

कोकिळ कुहू कुहू बोले...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/04/2014 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोकिळ कुहू कुहू बोले... कोकिळाचा फक्त आवाज मंजूळ असून चालत नाही. त्याचे अन्य वर्तन तसेच लाघवी व हवे हवेसे वाटावे असे असले तर त्या कूजनला दाद मिळते. 2 निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या या चित्र फितीतून जीवन संघर्ष प्रवृत्ती जन्मजात कशी असते याचे उदाहरण डकवले आहे.

5. स्कूटरची चोरी ! - हरवले ते गवसले का? व कसे? भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 10/04/2014 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्कूटरची चोरी! भाग २...
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली.

४. चिन्मयचे अपहरण नाट्य - हरवले ते गवसले का? व कसे? भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 09/04/2014 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर...

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 07/04/2014 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.

३. गेले आठशे आले आठशे - हरवले ते गवसले का?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 07/04/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 किस्सा कानपुरचा. गेले आठशे आले आठशे
‘कानपूर में पंगा नही लेनेका’
पोस्टींगला पोहोचायच्या आधीच मिळालेला संवैधानिक इशारा ऐकून मी हवाईदलाच्या कानपूर स्टेशनात शिरलो. सिव्हीलियनची युनियन बाजी, सटक्यात सुरे काढून भोसका भोसकीचे प्रकार नेहमीचेच. दारूची सोय लावायला मेडिकलची खोटी बिले भरून लाखो रुपयांची लूट करायला इथल्या कामगार नेत्यांची फूस व खासदाराचा वरदहस्त वगैरे मुळे कानपूर करामाती स्टेशन म्हणून अजुनही मानतात.

2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे! - हरवले ते गवसले का?

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 06/04/2014 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

'पर्समधील गणूचे लॉकेट शाबूत मिळाले' - हरवले ते गवसले का? व कसे? - १

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/04/2014 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

' दे टाळी ' - ' घे टाळी '

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 01/04/2014 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द ) लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का? आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो ' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी' दे विडा आणि शेवटी खा . ' किडा ' असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो ) मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.

विपश्यना साधकवीर परतले

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 31/03/2014 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५ विपश्यना साधकवीर परतले दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय?