Skip to main content

मौजमजा

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

चाळीस हजारी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 23/01/2014 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत. २७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे. विकिवर कस्काय लिहायचे बॉ? मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले! मी काय लेख लिहू? असा प्रश्न असल्यास आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा शोध घ्या. काही सापडले नाही तर लेख लिहून टाका.

क्ष-गफ ला पत्र... २

लेखक वडापाव यांनी बुधवार, 22/01/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
क्ष-गफ ला पत्र _____________________________/\_____________________________________ मी ते पत्र ठेवलं. समोर हाताची घडी घालून मस्त पोझ देण्यात आली होती. मला घाम फुटला होता. मी थरथरत्या हातांनी दुसरं पत्र उघडलं. तशी हाताची घडी सुटली. 'एक मिनीट' 'काय झालं?' 'तू हे लेटर वाचलंस ना?' मी 'हो' म्हटल्यावर तिने ते हातात उचलून घेतलं, आणि माझ्याकडे रोखून बघायला लागली. 'त्यातल्या कंटेंट बद्दल, म्हणजे मेसेजबद्दल आपण नंतर बोलूया.. आधी माझे काही डाऊट्स क्लिअर कर.' मी आवंढा गिळला.. 'क-क-कोणते डाऊट्स?' 'शिसानविवि म्हणजे काय?' मी निश्वास सोडला.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक यांनी बुधवार, 22/01/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

क्ष-गफ ला पत्र

लेखक वडापाव यांनी रविवार, 19/01/2014 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण छोट्याशा गैरसमजावरून मोठ्ठंसं भांडण झालं. नेहमीप्रमाणेच माझे जुने माफ केलेले (माफ करण्यापूर्वी घातलेल्या थैमानाचा आता, 'तरी मी शांतपणे सहन केलं होतं ते सगळं' असा न विसरता उल्लेख) अक्षम्य गुन्हे पुन्हा वर उपसण्यात आले!! मी सगळ्या शंकां-कुशंकांचं निरसन केलं, पण रूळावर पडलेल्या तीन मेजर धोंड्यांपायी गाडी जागची हलेना. नुसतीच भोंगा वाजवत बसली. वाजून वाजून शेवटी भोंगा थकला आणि गाडीने ट्रॅकच सोडून दिला.

जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 18/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
भायखळ्याचं जिजामाता उद्यान. जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल. हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच.

अचानक ठाणे कट्टा - वृत्तांत

लेखक भाते यांनी गुरुवार, 16/01/2014 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार समस्त मिपाकरहो, (घाबरू नका, मी काही पत्र लिहित नाही आहे) मिपाचा मी अनुभवलेला हा दुसराच कट्टा आहे. माझा पहिला कट्टा 'इस्पिकचा एक्का' यांचा पुण्यानंतरचा दुसरा आणि भारतातुन परत जाण्यापुर्वीचा मुंबईमध्ये झालेला कट्टा होता. माझ्या सुदैवाने, माझा दुसरा कट्टा 'जेडी' यांचा भारतातुन परत जाण्यापुर्वीचा एकमेव कट्टा होता. मिपाकर भारतातुन आपल्या कामासाठी इतर देशात परत जाताना भारतात कुठेतरी (कोण आहे रे तो मुंबई पुणे करतोय?) किमान एकतरी कट्टा करतातच! याअगोदर काही अप्रतिम कट्टे झाले होते त्याचे वृत्तांत मी वाचले आहेत.

प्रिय विद्या बालन हिस

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 14/01/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय विद्या बालन हिस, काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे.

किती बार बोला मत पी, मत पी.. ऐकताइच नई ये...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/01/2014 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती बार बोला - मत पी, मत पी.. ऐकताइच नई है... "खाना खाना के बाद आधा घंटा रुकने को बोला बुढ्ढा लोगने... बादमें पानी पीने का... ये सुनताईच नहीं।" "पेट में बैठा लोग को तकलीप होता भाय... हररोज नया हाटेल में मेनू कार्ड पकडकर साला उलटा सीधा खाता है... हज़म कैसा करायेंगे हम लोक... दो घास के बाद पानी पीता, कोक मूं लगाता, फिर पिझा के टुकडे मूं में ढकलताए... ठीकसे चबाता भी नही...फिर पीता ए... अपनके साथ अब नही जमता... जूस बनाना फिर मिक्स मार के डायजष्ट कराना पडता .. डॉक्टर के पास भी भेजा, हार्टभाई को भी मंजूर नही पडेला है...

ठाणे कट्टा -अचानक

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 13/01/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे. हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे.