Skip to main content

मौजमजा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 10/01/2014 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/26585 ...पुढे चालू अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत.... ============================================== क्रमांक-१) अंघोळ:- धार्मिक कार्यांची सुरवात या घोळापासून होते.म्हणूनच याला अं..घोळ असं म्हटलेलं आहे.

मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 05/01/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १) नारदमुनी उवाच: गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला. तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे.

इतकेच मला जाताना...

लेखक चिन्मय खंडागळे यांनी शनिवार, 04/01/2014 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
(भटसाहेबांची जोरदार क्षमा मागून...) इतकेच मला जाताना घर सोडून कळले होते सजणाने केली सुटका, नवर्‍याने छळले होते लांबवलेल्या पैशांचा, मधुचंद्र गडे उरकू या, मी दागदागिने घरचे, पिशवीत टाकले होते मी ऐकवली दुनियेला माझी सगळी रडगाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच हसू आले की, दारू देता नवर्‍याला मी औषध जुलाबाचे ग्लासात मिसळले होते प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते मी एकटीच त्या रात्री गच्चीवर जागत होते मी पळून गेले तेव्हा सासरचे घोरत होते...

बसल्यानंतर ची मजा,

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 04/01/2014 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्यानंतर ची मजा, दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता. बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात.

कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

कुणी घडवून आणले 'महाभारत'?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 26/12/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदनकेतु उवाच: श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो. मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे). एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले.

अनाहिता ठाणे कट्टा

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 26/12/2013 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले.

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

आणि रजनीकांत रडला - धूम ३

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 22/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.