Skip to main content

मौजमजा

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 19/01/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

आमची पहिली गाडी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 08/01/2013 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पहिली गाडी झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.

कथा - इरॉस आणि साइक

लेखक शुचि यांनी रविवार, 16/12/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा वाचनात आली. तिचा हा अनुवाद - खूप पूर्वी पृथ्वीवर एक राजा रहात होता. राजाला ३ मुली होत्या. सर्वात जी धाकटी होती ती अत्यंत मोहक होती. तिचे नाव होते "साइक" (psyc). साइक इतकी सुंदर होती की दूरदूरुन तिला पहाण्यासाठी लोकं येत आणि तिच्या सौंदर्याची स्तुती करत. ते म्हणत की साईक ही प्रत्यक्ष सौंदर्याची देवता "अ‍ॅफ्रोडाइट" (afrodite) पेक्षाही सुंदर आहे. अ‍ॅफ्रोडाइट ची साइकशी काय तुलना? अ‍ॅफ्रोडाइट ची मंदीरे ओस पडू लागली, लोक तिची पूजा करेनासे झाले. त्यामुळे झाले काय अ‍ॅफ्रोडाइट ची झोप उडाली, तिला साइकचा दुस्वास वाटू लागला.

आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 10/12/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल.

समसचा २० वा वाढदिवस

लेखक विकास यांनी सोमवार, 03/12/2012 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबर १९९२ ला नील पॅपवर्थ नामक ब्रिटन मधील एका टेलीकम्युनिकेशन मधे काम करत असलेल्या इंजिनियरने मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टंकले आणि "एंटर" चे बटन दाबताक्षणी ते युकेस्थित व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंजापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतिर्ण झाले आणि जगातला पहीला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनियरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यापुढे काही नव्हते. पण कंपनीच्या उद्योजक मनास त्यातूनच एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले.