Skip to main content

मौजमजा

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 05/03/2013 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य bus ( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.: http://sagarshivade07.blogspot.in/2013/01/st.html ) हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे. वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST

काचेचा लोलक

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 05/03/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
काचेचा लोलक कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा .... दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा ..... कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ........... अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ????? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक .... मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार !! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले ...लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये ....

कविंचे काव्य...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 26/02/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अपल्यातून जर कवि गेले,तर अपला काय असेल सूर? आणी कवितून काव्य गेले,तर कसा असेल त्याचा नूर?
काव्यरस

चोरावर मोर!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 13/02/2013 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
1 २६ जानेवारी १९८७! दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो.

आणखी एक टायटॅनिक

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 12/02/2013 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती... दुसरीकडे सर्वत्र अपघाताच्या बातम्या टी.व्ही.

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 10/02/2013 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे. डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या.

एक दक्खनी कविता - कुतुबमिनार

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 09/02/2013 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
'परसूंकीच बात है' हा लेख लिहून बरेच दिवस झाले. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दक्खनी भाषेबद्दलही काही विचारणा होत्या. मी काही दक्खनी भाषेचा जाणकार नाही. पण त्या भाषेची आणखी ओळख वाचकांना व्हावी म्हणून म्हणून इथे त्या भाषेतील एक कविता देत आहे. दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे. (कदाचित 'सख्खी' असे म्हणता येईल.) दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली.
काव्यरस

मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा - पुरवणी

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 06/02/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आदिजोशीने दिलेला 'आँखो देखा हाल' फक्त चर्चगेटहून आलेल्या मिपाकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएम) कडून आलेल्या लोकांची संख्या जास्त होती, पण त्यातल्या कुणीच काही लिहिले नाही आणि बहुधा त्यांनी आदीला 'फीडबॅक' दिला नसेल म्हणून त्यानेही त्यांच्याबद्दल फारसे लिहिलेले दिसत नाही. त्यामुळे मीच पुढाकार घेऊन चार ओळी लिहायचे ठरवले. हे जर प्रतिसादात दिले असते तर कुणी वाचले नसते असे मला वाटले म्हणून वेगळा लेख लिहिला आहे. मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते.

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

हे " शास्त्रीय संगीत" हाय तरी काय राव ? ( भाग १)

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 29/01/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ' मधुबनमे राधिका नाचेरे ' हे गीत आवडत असते पण राग " हमीर" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' अब तो तेरे बिन जी लेंगे हम "' हे गीत आवडत असते पण राग " अहीर भैरव " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' छैया रे छैया ' ( द ट्रेन) ' हे गीत आवडत असते पण राग " मालकंस" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' गोरी तोरी बाँकी ' हे गीत आवडत असते पण राग " भैरवी" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' साज हो तुम आवाज हुम मै ' हे गीत आवडत असते पण राग " पटदीप " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' तू चीज बडी है मस्त मस्त ' ही गीत आवडत असते पण राग " भीममपलास" मधे आहे हे आपल्याला