गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.
आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.
“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.
“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्यावर आणत.
“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो!