पहेले 'मार' का पहेला गम!
'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय.
जे सत्तर ऐंशीच्या दशकात शाळेत होते त्यांच्यासाठी शाळेत मार खाणं (शिक्षकांकडून.. इतर पोरांकडून नव्हे) हा अगदी सर्वसाधारण मामला होता. (नंतरचं मला माहित नाही.
मिसळपाव
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.