Skip to main content

मौजमजा

दुसर्‍या कुत्र्याच्या प्रतिक्षेत ( तिचा कुत्रा -१)

लेखक रामजोशी यांनी मंगळवार, 15/11/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा कुत्रा - १ एक प्रयत्न. (विवेकरावांची क्षमा मागून) लहानपणापासुन ओळख होती आमची भेटत होते तसे रोजच. “मित्रच माझा” म्हणाली. 'हुषार आहे अगदी' हसले मी. 'कुत्रे असतातच हुषार' म्हणाले. 'नाही, पण हा. म्हणजे....' ती म्हणाली 'हुशार हो अगदी सकाळी बाहेर जातो न चुकता घरावर तर लक्ष फार सगळे दारूडे, चोर, अगदी “यांच्यावर” सुद्धा. माझ्याकडं बघताय ना? वाटते का तिशीची? याच्याशी खेळणे अगदी रोजच्या रोज रेग्युलर आहे तसा तो सगळ्यातच आणि पर्टिक्युलरही.

आपली तर काय.....

लेखक वपाडाव यांनी सोमवार, 14/11/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपली तर काय लायकीच नाय तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... .................तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय
काव्यरस

ससे आणि जादुगार -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 10/11/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे छोटे ससे कसे टकमक इंद्रधनू बघती - बघता कोपऱ्यात ते रुसुनी मुकाट का बसती ! चुन्यात बुडुनी आलो वाटे, लाल ना कुणी निळे - रंग कुणाचे ना नारंगी कुणीच ना काळे पिवळे !

!! मोरया !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/11/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.

देऊळ.!! तु झोप मी जागा आहे!!

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 05/11/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला. महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!!

Acacia

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 05/11/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष. डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.

'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 02/11/2011 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली.

महागाई.. महागाई ..

लेखक विदेश यांनी बुधवार, 02/11/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक सोन्या-चांदीचे गगनी भाव जरी भिडले गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी दागदागिने बहु घडले ! थेटरातला चालू आहे उघडा काळाबाजार पहिला खेळच पहायचा जडला आहे आजार ! चार चाकी दोन चाकी वाहने उच्चांकात नवी भाव वाढते पेट्रोलचे नको सायकल चैन हवी ! ग्यास रेशन कपडालत्ता गरजा सोडुन भलतिकडे कर्जामधुनी खर्च वाढतो धूमधडाका चोहिकडे !
काव्यरस