Skip to main content

नाट्य

विजय तेंडुलकरांचा !

लेखक दिपोटी यांनी बुधवार, 19/05/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

मोहविते मज तव गंधीत कांती

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 14/05/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोहविते मज तव गंधीत कांती
चालः एखादे नाट्यपद असावे अशी चाल आहे. आपण ती चाल येथे ऐकू शकतात. (मी काही गायक नाही.
काव्यरस

मला आवडलेला चित्रपट!!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 10/05/2010 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
weeping camel कथा आहे एका भटक्या कुटुंबाची आणि त्यांच्या जित्रापाची!! वसंत ऋतूच्या सुरवातीला यांच्या जित्रापाचा विणीचा हंगाम. कथा घडते मन्गोलिअन वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर. दूर वर पसरलेले वाळवंट आणि खुरटी झुडुपे. जित्राप म्हणजे मेंढ्या, शेळ्या आणि उंट. हे नोमाडीक कुटुंब त्यांच्या जित्रापावर पुरे पूर अवलंबून, पण म्हणून या नात्यात कुठे ही व्यवहार वां पिळवणूक अजिबात जाणवत नाही. हेच तर या चित्रपटाच मर्म.

इंटरव्यु - इंटरव्यु

लेखक टारझन यांनी बुधवार, 21/04/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , प्रत्येक नोकरी करणार्‍याला न चुकलेलं एक चक्र म्हणजे इंटरव्यु (कोण चोच्या मुलाखत म्हणाला रे ? ही काय टिव्ही वर दाखवायची गोष्ट आहे का ? ) असो. इंजिनियरींग मधे जसा फायनल इयरला आलो तसे इंटरव्यु चे वेध लागलेले. अ‍ॅक्चुअली तेंव्हा व्हायवा किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस घेतली जाणारी ओरल ... ह्या गोष्टींना कधी घाबरलो नसलो तरी एक प्रकारचा नर्व्हसनेस माझ्यात असे. कँपस इंटरव्यु मधे आमच्या पराक्रमांमुळेच बर्‍याच कंपण्यांच्या क्रायटेरियातुन आम्ही बाहेर पडायचो .. तेंव्हा त्याची तर माणसिक तयारी होतीच. पण मग आम्ही फावल्या वेळात लोकांचं निरिक्षण करायचो ..

नाटकवेडी मुले शिरगावची नविन

लेखक शनआत्तार यांनी रविवार, 04/04/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी या आधी आमच्या खेडे गावात चालणारी नाट्य चळवळ या बाबत आपणाशी बोललो आहे. आमच्या नाटकातील मुलांची कमाई आपणास मी दाखवणार आहे आज अनेक चित्रपटातून आमच्या शाळेची मुले चमकत आहेत आमच गाव म्हणजे बालकलाकारांच गाव अशी आमच्या गावाची ओळाख पुण्या मुंबई मध्ये झाली आहे. आम्ही दोन वर्षा पुर्वी पुणे व मुंबई येथे आमच्या मुलांची नाटके घेऊन गेलो होतो त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या शाळेतली मुले आज देवराई, बाधा, असला घो हवा मला, गाभ्रिचा पाऊस, प्रतिसाद एक कप चहा या चित्रपटात अभिनय करून गावाचे व शालेचे नाव मोठे केले आहे.झी पुरस्कारासाठी सचिन मोडकर याला नामांकन मिळाले होते.

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

हे सुरांनो चंद्र व्हा रे

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 26/03/2010 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे सुरांनो चंद्र व्हा रे... अर्चना कान्हेरेंने आळवलेली ही विनवणी. ह्याला गाणं म्हणावं तर त्यातल्या आर्ततेशी प्रतारणा केल्यासारखं होईल. अगदी सुरुवातीचा आलाप डोळे बंद करून ऐकावा. एकदा नव्हे, दोनदा नव्हे अनेकदा. जोवर त्यासोबत झंकारणारा तंबोरा आणि तबल्यावरची थाप अंगावर काटा आणत नाही तोवर पुढे जाऊच नये. डोळ्यांत पाणी दाटण्यावेळी कधी बोलायचा प्रयत्न केला असाल तेव्हा कंठ, आवाज जसा कंप पावेल तशी तबल्याची सुरुवात. सुरांनो चंद्र व्हा म्हणताना 'व्हा'मध्ये येणारी जीवघेणी आर्तता ह्या दोन ओळींवर खिळवून ठेवेल.

"न येती उत्तरे'' काही अनुभव......

लेखक प्रमोद काळे यांनी गुरुवार, 25/03/2010 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रमोद काळे. पुण्यात राहतो. पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या सांस्कृतिक संस्थेबरोबर काम करतो. नाट्य लेखन, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण यात विशेष रस. नुकतेच मी "न येती उत्तरे" नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले. त्याचे आजवर सात-आठ प्रयोगही झाले. हे सर्व घडत असताना आलेले विविध अनुभव कुठेतरी नोंदणे महत्त्वाचे वाटले. म्हणून हा एक प्रयत्न. नाटकाची संकल्पना अनेक दिवस मनात होती. पण विषय समलैंगिकता असल्याने या विषयाचा अभ्यास, जाणकारी असणे महत्त्वाचे होते. हा विषय आपल्या समाजात मोकळेपणाने चर्चिला, बोलला जात नाही. त्याला सामाजिक कारणे खूप आहेत.

मोहन वाघ, नाट्यक्षेत्रातला एक दिग्गज!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/03/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार मोहन वाघ यांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली.. तात्या.

खिडक्या

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 24/03/2010 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला म्हणलं नेहमीप्रमाणे सुदर्शनला जाव. नाटक होत खिडक्या मूळ जर्मन नाटकाचे मराठी भाषांतर विद्यासागर व सुनंदा महाजन यांनी केलंय. कलाकार- ज्योती सुभाष, असीम पाळंदे आजी व नातू या दोनच पात्रांभोवती हे नाटक फिरतं. कमल आजी वय ७० (ज्योती सुभाष) व तिचा नातू प्रसाद वय २५ (असीम पाळंदे) यांच्या संवादातून होणारी तीन पिढ्यांचे चित्रण यात आहे. कमल आजीला प्रसाद मोठी आई म्हणतो. कारण आजी म्हटल्यानं तिला म्हातारं वाटतं. स्टेनो म्हणून रिटायर झालेली कमल व तिचा नवरा गोविंद हे दोघेच मुंबईत फ्लॆट मध्ये राहत असतात. दोघांची मुले अमेरिकेत व मुलगी कानपुरला. मुलांशी फारसा संपर्क नाही.