Skip to main content

नाट्य

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

न येती उत्तरे

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 14/03/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
न येती उत्तरे
लेखन व दिग्दर्शन:- प्रमोद काळे संगीत:- अक्षय कुलकर्णी नेपथ्य: - सचिन भिलारे प्रकाश योजना:- अपुर्व साठे कलाकार:- हर्षद राजपाठक, मंदार कुलकर्णी निर्मिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे मागच्या टायमाला हे नाटक बघायचं हुकलं. आज अचाकनक ठरवले कि जायच आन संमोहित झाल्यासारखा नाटकाला गेलो. सुदर्शन रंगमंच च्या प्रथेप्रमाणे चप्पल काढुन स्टँडवर लावली. मी हातात धरुन वरती ठेवतो म्हणजे तेवढच सेफ. नाहीतर निम्माजीव चपलेत अडकायचा. आतमधे गेल्यावर फॅन पाहुन खुर्ची पकडली.

कंट्रोल....

लेखक भानस यांनी गुरुवार, 25/02/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
( साधारण सव्वासात-साडेसातच्या दरम्यान मीनल व महेश घरी येत असत. बहुतेक वेगवेगळे क्वचित ठरवून स्टेशनवर भेटलेच तर बरोबर. मीनलचे भाजीपाला-खाऊ, गरजेच्या गोष्टी खरेदीत महेश वैतागत असे त्यामुळे शक्यतो ही सारी कामे मीनल एकटीच करी. आजही नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मीनल पाळणाघरात गेली. चार वर्षाची मधुरा आईची वाट पाहतच होती. रिक्शातून उतरून मीनलने तिला हात केला तशी मावशींना टाटा करून मधुरा तिची छोटीशी बॅग घेऊन खाली आली व मीनलला मिठी मारून बसली. दिवसभराच्या अनेक गोष्टी आईला सांगायच्या असल्याने मधुराने चिवचिवाट सुरू केला. मायलेकी दहा मिनिटात घरी पोचल्या.

अजीब दासताँ है ये - तिला आठवताना

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 24/02/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
...आज अचानक संध्याकाळी का कोणास ठाऊक. पत्नी छायाचा हसरा गोरापान चेहरा, घारे डोळे, त्यावर गॉगल,बेलबॉटम पँट, बुशकोट टाईप टाँप, हाय सँडल्स, कपाळावर जरा मोठी लाल टिकली. - 'सो व्हॉट' - म्हणायची स्टाईल आठवली.छाया आली आणि गेली. आठवणींची सौगात देऊन. त्याला ३२-३३ वर्षे झाली... ... एक साडेसात नंतरची चंदीगढजवळच्या पिंजोर गार्डनजवळ रविवारची संध्याकाळ. रस्त्यावरच्या वाहनांचे दिवे डोळ्यांना दिपवत होते. तेंव्हा धक्का बसल्याचे जाणवले व मी लुडकून स्कूटर अंगावर घेऊन धडपडलो. छाया कोसळली. रस्त्याच्या मध्यावर जाऊन आडवी झाली. म्हशींचा तांडा जात होता.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/02/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… (या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या

रेशीमगाठी..

लेखक राधा१ यांनी शनिवार, 13/02/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसन्न सकाळ... सगळे रोजच्या सारखेच सुरु होते. धडधड...रोजचेच स्टेशन..रोजचीच गाडी...वेळ एकदम सकाळची म्हणुन फारशी गर्दी नाहीच.. लेडीजचा पहिला दर्जाचा डबा..एक रोजचा ग्रुप दारात गप्पा मारत उभा आहे... बाजुच्या जेन्ट्सच्या डब्याच्या दारात दोन मुलं निसर्ग सौंदर्य (???) बघत इकडे तिकडे बघत उभे आहेत. एका मुलाच लक्ष सहज(?) मुलींच्या डब्याकडे जातं..आणि एका मुली बरोबर नजरानजर होते. आणि मग येथे सुरू होतो...

(नो एक्स्पेक्टेशन्स)

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 12/02/2010 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
ते - मी हाकलून देइपर्यंत काल गेला नाहीस? तो - तसं काही नाही. ते - तसच तस्सच. तो - तुला अता भ्रमच पोसायचा असेल तर .... ते - अ‍ॅ हॅ रे भ्रम! मग मी "चालते व्हा" ची खरड पाठवल्या पाठवल्या कसा गमन झालास? तो - योगायोग : ) ते - व्वा आम्ही मारे भ्रमात होतो आम्च्या खरडीचा एवढी वट आहे. तो - आपल्या भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल क्षमस्व. : P ते - ज्जा ... आता परत करणरच नाही खरड. तो - बघ आपलं काय ठरलं होत - नो एक्स्पेक्टेशन्स. तुम्ही डेव्हिएट होताय. ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. ;) ) तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) ....

दलपतसिंग येता गावा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 26/01/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी प्रजासत्त्ताक दिनी आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य केल ते म्हणजे दलपतसिंग येती गावा नावाचा शुभारंभाचा नाट्यप्रयोग भरत नाट्य मंदिरात पाहिला.पुण्यात लोकशाही उत्सव समिती च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्र्मांतर्गत या शुभारंभाचा प्रयोग दणक्यात झाला. ५ जानेवारीला आपले मराठी ब्लॊगर मुक्त्त सुनीत पुण्यात होता. त्याच्या सोबत (खर म्हणजे त्याच्या ओळखीने ) मी, बिपीन कार्यकर्ते मंडळी अतुल पेठेंना भेटलो. तेव्हा गप्पांमधे त्यांच्याकडुन जांबसमर्थ नावाचे गाव प्रथमच ऐकले. जालन्यापासून सुमारे १०० कि. मी. अंतरावर हे छोटे गाव आहे.

बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 11/11/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर अकादमी, पुणे निर्मित प्रा. सतीश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि. १०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला. त्या निमित्ताने हे विस्कळित विचार (म्हटले तर समीक्षण) - प्रा. सतीश आळेकर या नाट्यलेखकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही.

सुनीता देशपांडे यांचे निधन...

लेखक विद्याधर३१ यांनी शनिवार, 07/11/2009 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले. "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.