Skip to main content

प्रवास

गणपती भी अल्लाह है !

लेखक पंख यांनी शनिवार, 18/12/2010 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल-परवा काही कामानिमित्त सोलापूरला जाणे झाले. आता पुणे-सोलापूर प्रवास महामार्गावरुन करणे अशक्यच वाटते, त्यामुळे ट्रेनचा पर्याय निवडला.. तिकडुन येताना दुपारच्या ईंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अतिरीक्त डब्यात आरक्षण मिळाले होते. शुक्रवार त्यात मोहरम त्यामुळे गर्दी असणार हे अपेक्षित होतेच पण आरक्षणही अतिरीक्त ड्ब्यात मिळाल्याने काहिसा नाखूषच होतो.. पण पर्याय नसल्याने आत घुसून माझी जागा शोधली.. जागा मात्र खिडकीशेजारी असल्याचे बघुन जरा हायसे वाटले. (आम्ही नेहमीचे रेल्वेप्रवासी नसल्याने आरक्षण करताना ex02 म्हणजे अतिरीक्त डबा असतो हे समजले नाही त्यामुळे अगोदर हा डबा सापडायलाच पळापळ झाली !)..

महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

लेखक स्पा यांनी सोमवार, 06/12/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586 आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही..... भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नं

सोलेमस्कोगेन (नॉर्वे)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 28/11/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्लोच्या उत्तरेला कोठलीशी एक टेकडी आहे असे माहीत होते. मागे अक्षय तिकडे जायचे म्हणून बसने आणि पायी बराच फिरला होता. पण खराब हवामानामुळे त्याला मधूनच मागे फिरायला लागले होते. एकदा तिकडे जाऊनच येऊ या असे म्हणत आम्ही 'सोलेमस्कोगेन'ला जाणरी ५६ नंबरची बस पकडली. या मार्गावरचा सोलेमस्कोगेन हा सगळ्यात शेवटचा थांबा आहे. इथून बस मागे वळते आणि परत ऑस्लोला जाते. जाताना तुरळक घरे दिसतात. रस्ताही थोडा वळणावळणाचा. सोलेमस्कोगेनला आम्ही बसमधून उतरलो आणि सगळीकडे पसरलेले, कापसासारखे पिंजून ठेवलेले हिम दिसू लागले.

महाराष्ट्र दर्शन - भाग ४/ "पैठण"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली...... मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी.... बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो.

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.