Skip to main content

प्रवास

लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 29/07/2010 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी ============================================ फेरीवाले आणि भिकारी यांचा सगळ्यात जास्त सुळसुळाट लेडीज डब्यातच असावा.. त्यात पुरूष फेरीवाले आणि भिकारी ही आलेच. आंधळ्या भिकाऱ्यांना तर लेडीज डबे अगदी अचूकपणे ओळखता येतात.. कधीही न चुकता ते या डब्यांमधून सहज चढ-उतर करतात.. डब्यात चढल्यावर मात्र त्यांना समोर उभ्या असलेल्या बायका दिसत नाहीत. कोणत्याही टीसीने आजवर भिकाऱ्यांना हटकलेलं मी पाहिलेलं नाही.. फेरीवाल्यांना मात्र कधी कधी डब्यातून उतरवलं जातं. नेहमीच दंड किंवा शिक्षा केली जाते असं नाही. ते एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात चढतात.. पाळली जात नसली तरी..

मळ्यातली सहल

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 29/07/2010 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्‍याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.

भिकारी पोट्टा (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 28/07/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिकारी पोट्टा =============================== . . लोकलमध्ये नेहमीच बऱ्याच किरकोळ घटना घडत असतात.. इतक्या सर्रास दिसणाऱ्या सामान्य.. की आपल्या लक्षातही येत नाहीत. मग त्यांत लक्ष घालणं.. त्यांना लक्षात ठेवणं या तर फार दूरच्या गोष्टी..! पण रोजच्याच प्रवासात रोजच्या प्रवाशांपैकी कोणी कधी रोजची अनास्था दूर सारून नेहमी पेक्षा वेगळं वागताना दिसतं.. आज तसंच झालं. ऑफिसमधून घरी येताना.. नेहमीप्रमाणे एक मुलगा डब्यात झाडू मारायचं निमित्त करून भीक मागायला आला.

चढाई 'पेद्रो दि गावा'ची..

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 27/07/2010 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च २०१० ला जेव्हा मी रिओ ऑफिस मध्ये पाय ठेवला तेव्हा दरवाज्यातून समोरच्या खिडकीबाहेर दिसणारे दृश्य पाहून मी दोन मिनिटे स्तब्ध झालो.. एक प्रचंड मोठी दगडी भिंत, एक सुळका आणि घनदाट जंगल.. DSCN0424 DSCN0428

दहशत (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 27/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहशत ====================================== मुंबईत राहणाऱ्या.. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाजवळ अशा प्रकारचे भरपूर अनुभव असतील.. मी लिहिलेल्या प्रसंगांपेक्षा जास्त मजेशीर.. खिळवून ठेवणारे.. विचार करायला लावणारे.. हेलावून सोडणारे.. किंवा सुन्न करून टाकणाऱ्या या अशाच अनुभवांनी मुंबईकरांना, एका सूत्रात गुंफले आहे. लोकल प्रवास मुंबई करांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. आणि तितकाच जिव्हाळ्याचाही. मुंबईतली गर्दी, धावपळ, गतिमानता.. लोकल्सच्या वेळा, ऑफिस, घर ऑफिसातल कामकाज.. त्यातूनच शोधून उपभोगलेले.. धरून ठेवलेले उत्सवी क्षण या सगळ्याची नशा मुंबईकरांच्या नसानसांतून वाहताना दिसते.

मैत्री एक्सप्रेस (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 26/07/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री एक्सप्रेस ====================================== एखाद्या दिवशी लोकलने जाता जाता.. शाळा कॉलेजमधली एखादी मैत्रीण भेटते आणि मग जुळलेल्या सुरांच्या मैफिलीला पुन्हा एकदा रंगत चढते. आनंदाच्या चित्कार पाठोपाठ उत्सुकतेपोटी लांबलेली प्रश्नावली.. गहिवरून टाकते.. तुझी माझी ख्यालीखुशाली विचारत विचारत शब्दांची पाखरं चिवचिवत पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हलकेच घेऊन जातात.. आणि मग तू, मी भोवती फिरणारे संवाद त्या त्या दिवसांच्या उजळणीत विरतात. तेव्हाच्या आठवतील तितक्या नावांच्या हजेरीने दोघी वा तिघीच समोर असताना अनुबंधांच रजिस्टर पूर्ण भरलं जात. कोण कुठे आहे.. काय करतंय.. कोण किती कुठे शिकतंय..

"मी मुंबईकर" (लोकल गोष्टी-७)

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 25/07/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
"मी मुंबईकर" ============================================= आजपासून बरोबर अठरा वर्षांपूर्वी.. मी, व माझ्या भावंडांनी पहिल्यांदा मुंबई पाहिली. वडिलांचं बऱ्याचदा ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईत त्या आधी येणं-जाणं होत असे.. आताही अगदी या आठवड्यापर्यंत मुंबईची बदली रद्द करण्यासाठी म्हणून ते मुंबईला जाऊन आले होते. बावीस वर्ष एकाच भागात राहिल्या नंतर आताची ही मुंबईची बदली त्यांना नको होती. बदली रद्द करण्याचे ती एखाद्या दुसऱ्या ठिकाणी करून घेण्याचे सगळे प्रयत्न थकल्यावर अगदी ऐनवेळी आमचं मुंबईला जायचं निश्चित झालं. त्यामुळे मुंबई प्रवासाची अशी काहीच तयारी झाली नव्हती.

गर्दीतला चेहरा (लोकल गोष्टी-६)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 24/07/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दीतला चेहरा ============================================ ट्रेन मधून प्रवास करताना, आतापर्यंत कित्येक चेहरे दिसले.. त्यातले लक्षात राहिलेले किती..? अगदी काही, बोटांवर मोजता येण्या इतकेच. आपल्याला दिसतो.. लक्षात राहतो तो एकच गर्दीचा चेहरा. मग त्यात काही शाळकरी मुला-मुलींचे घोळके असतात.. कॉलेजला जाणाऱ्या जोड्या दिसतात.. ट्रेनच्या इतक्याच सातत्याने कामावरून जाणारे - येणारे जीवनसारथी.. अखंडपणे कार्यरत असलेल्या मुंग्यांसारख्या तुरुतुरु चालणाऱ्या बायका.. एक दोन मैत्रिणी सोडल्या तर चेहरा असा कोणालाच नाही. ( मलाही नाहीच ) आपल्या व्यतिरिक्त प्रत्येक जण म्हणजे गर्दी आणि आपण गर्दीतले एक.