Skip to main content

राजकारण

दोन अश्रू आणि एक सलाम..!

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 15/08/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं, त्यांना कधीच विसरलो आहोत... त्यांच्या नावानं जे पुढारले, त्यांच्यावरच विसंबलो आहोत... 15 ऑगस्ट, 26 जानेवारी... मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील.. सुट्टी जर जोडून आली, तर फारच बहार आणतील... तीन-चार दिवस स्वातंत्र्याला, बघा कसं उधाण येईल.. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले, त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल... जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी, पुन्हा कशाला आठवायच्या..? असे जर म्हणत असाल, तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..? आपण करतो मौज-मजा, त्यांनी सांडलेल्या रक्तावर.. आपण उपभोगतो स्वातंत्र्य, त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर... देशासाठी मेले ते...

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 15/08/2014 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जिल्हा - पालघर

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 01/08/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे. Palghar District

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

लेखक जीएस यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.

गोपिनाथ मुंडे

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/06/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

महाभारत

लेखक निलरंजन यांनी शनिवार, 31/05/2014 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते, जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार झगडावे लागते, हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय, जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय, तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय, हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !! इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय, माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय, दूरदूरवर पसरलाय अन्याय, न्याय माञ कुठेतरी हरवलाय, हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !! मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत, शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला ला

मिपाकरांच्या आशीर्वादाने...

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 30/05/2014 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो... मिपावर गेली काही वर्षं जिलब्या पाडून, त्या तुम्हाला बळेबळे खायला लावून, त्या कशा झाल्यायत याबद्दलच्या तुमच्या दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया माझ्या 'धाग्यांच्या' पदरात पाडून घेऊन, पुढच्या जिलब्या त्यातल्या त्यात 'ब-या' कशा होतील याचा सातत्याने प्रयत्न करून झाल्यानंतर, आता मी लोकप्रभा साप्ताहिकात अधूनमधून लिहायला सुरुवात केलेली आहे... म्हणजे मी तसा सतत लिहीतच असतो, पण ते अधून मधून माझ्या लेखनाची, छपाईसाठी निवड करतात एवढंच. तर या लोकप्रभा साप्ताहिकात आलेल्या माझ्या दोन लेखांचे दुवे मी इथे जोडतोय. यातल्या एका लेखाचा दुवा मी या आधी काही दिवसांपूर्वी ख. फ.

महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 25/05/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्‍या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्‍या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला!