Skip to main content

राजकारण

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

रफाल - भाग ३

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 23/10/2018 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे https://www.misalpav.com/node/43446 https://www.misalpav.com/node/43450 भाग ३ - संरक्षण खरेदी प्रक्रियेबद्दल थोडेसे आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी AoN - ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी. ASR - एअर स्टाफ रीक्वायरमेंट्स. CAG - कंपट्रोलर ऑडिटर जनरल. CCS - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. DAC - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल. DCS - डायरेक्ट कमर्शियल सेल्स.

रफाल - भाग २

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 17/10/2018 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

रफाल - भाग १

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 16/10/2018 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
रफाल रफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

तामीळनाडू आणि गूगल ट्रेंड

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/07/2018 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
करुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले. * तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले. * तामीळनाडूच्या नेते मंडळीत सध्या हयात मध्ये केवळ रजनीकांत ही रजनीकांत आहे. डिएमके चे करुणानिधी त्यांचे सुपूत्र स्टालीन ,ए आय ए डिएम के चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राहुल गांधी, पि.

एक मराठा लाख मराठा

लेखक खिलजि यांनी बुधवार, 25/07/2018 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
" एक मराठा लाख मराठा " पूर्वी गुंजला होता नाद गिनीज बुकात नाव नोंदवुनी मराठ्यांनी घेतली होती दाद नव्हता कुणाचा अंकुश तेथे नव्हते कुणीही नेते गल्लोगल्ली येऊनि मिसळले लाख लाख मराठे काकासाहेब गेले बुडुनी (?) झाला मोठा आघात बंद पुकारला खरा तरीही पण चढला हिंसेचा माज मी हि मराठा तरी भेदत आलो चक्रव्हुय ते सारे शांततेतच खरा जोर असे नको हिंसेचे वारे मराठा असूनही आज मला वाटत आहे लाज पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा नको आरक्षणाचा साज सिद्धेश्वर विलास पाटणकर

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

माझे नेहरवायण १

लेखक माहितगार यांनी शनिवार, 26/05/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.

न्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सभा , बरखास्ती प्रस्ताव आणि काही वेगळे प्रश्न या महिन्यात भारताच्या सर्वोच्च न्यायाधिशां विरुद्ध बरखास्तीचा प्रस्ताव राज्यसभेतील जवळपास ६५ खासदारानि राज्यसभा अध्यक्ष (उपराष्ट्रपती) व्यंकय्या नायडू यांच्या कडे पाठवला तो राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला आहे तूर्ततरी दिसते . एकंदर प्रकाराबद्दल मला काही जरासे वेगळे प्रश्न पडले . राज्यसभा हे भारतीय संसदेच वरीष्ठ सभागृह.