Skip to main content

राजकारण

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/03/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला. 'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली.

होळी विशेष वृत्तांत ..

लेखक बामनाचं पोर यांनी गुरुवार, 19/03/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
होळीच्या निमित्ताने आमचा विशेष वृत्तांत... सर्व वाचकांना होळीच्या मनापासुन शुभेच्छा !! १) चांद्रयानला अभुतपुर्व प्रतिसादामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशापूढील सर्व प्रमुख प्रश्न आता जवळपास सुटल्यात जमा आहेत. चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो पाहुन कृतकृत्य झालेल्या काही बांधकाम व्यवसायीकांनी स्वता:हुन मुंबईतल्या सर्व रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. चांद्रयानने पाठवलेल्या चित्रफीत भारतात खेड्या-पाड्यात सामुदायीकपणे दाखवल्या गेल्या. यावेळी गावकरयांनी अभुतपुर्व एकी दाखवुन आपसातले सर्व तंटे मिटवले ( चंद्राच्या साक्षिने) . " तंटमुक्त गाव" योजना एका रात्रीत पुर्णत्वास गेली आहे.

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 11/03/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

आय डोन्ट सी यू!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 10/03/2009 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख राजकारणाचे विडंबन असून, राजकारणाचा, विडंबनाचा, (तथाकथित) उपरोधिक लिखाणाचा तिटकारा असलेल्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. गेल्यास होणाऱ्या त्रासास लेखक जबाबदार राहणार नाहीत.) प्रकृतिअस्वास्थ्यामुळे "आयसीयू'त असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजारपणाच्या आधीपासूनच बऱ्याच जणांना राजकीय धक्के देऊन त्यांची राजकीय प्रकृती बिघडवून टाकली होती. रुग्णालयात असतानाही ते असे काही करतील, याची भल्याभल्यांनाही कल्पना नव्हती. अडवानींनी ठाकरेंची भेट मागितली आणि ती नाकारल्याची चर्चा भाजप-शिवसेनेपेक्षाही प्रसारमाध्यमे आणि कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'तच जास्त रंगली.

तिच्या नजरेतून...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 08/03/2009 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

उपेक्षित सावरकर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 26/02/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.

तालिबानीस्तान !

लेखक भोचक यांनी बुधवार, 18/02/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.

भेट तुझी-माझी स्मरते...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 16/02/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्‍या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील. मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे. कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्‍स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली.

साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन

लेखक मैत्र यांनी शुक्रवार, 13/02/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम वेगळं मुखपृष्ठ आणि नाव वाचून कुतूहलाने एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि संपल्यावरच खाली ठेवलं. मूळ लेखिका: कारमेन बिन लादेन. अनुवाद - अविनाश दर्प, न्यूझीलंड. मेहता पब्लिशिंग हाऊस. परीक्षण लिहावं असं लिखाणात विशेष नाही. पण परिचय लिहावाच असं पुस्तक फार महत्त्वाचं आहे असं वाटलं. ते वाचायला मिळालं तर उत्तमच पण नाही जमलं तर गोषवारा इथे द्यावा आणि पुस्तकापेक्षा त्या संदर्भात काही चर्चा व्हावी असं वाटलं... क्रमशः चा लागण न करता एक मोठं लिखाण मांडतो आहे.