Skip to main content

रेखाटन

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

रंगात रंगलो मी - रंगाविना

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/05/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मित्रहो, नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली. मग आपल्या घरी पी सी आला रे आला .

टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप.

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 21/05/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार.. माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती, आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत....

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह

लेखक यकु यांनी रविवार, 20/05/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले.

भंकस

लेखक यकु यांनी शनिवार, 21/04/2012 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे तसं काही नाही विशेष लिहिण्‍यासारखं. च्यायला एवढी चांगली सुट्टी असून आज ऑफिसात येऊन बसावं लागलंय. मग आम्ही दुसरीकडे कुठे जाणार? इथेही आलो तर काय ते लोक नेहमीप्रमाणे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलेले. जरा म्हणून मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायची सोय नाही. त्यातून मला आजकाल मिपावर ''असहमत'' असा आयडी घ्‍यावा वाटतोय. आता हे मध्‍येच कुठं आलं? पण हे असंच. आजकाल सगळी जिंदगीच बोगस झाली आहे. हे म्हणजे नेहमी सुचणारं वाक्य. त्यातून ती कोसला आणि बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट, कंम्प्लीट शेरलॉक होम्स कॉटवर पडलेले असते आणि आजकाल लॅपटॉप बंद! मग आम्ही यातलंच कुठलंतरी पुस्तक उचकणार आणि सकाळचे साडेचार वाजवणार.