रेखाटन
माझी चित्तरकथा
माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.
रांगोळ्या
सुदर्शन पटनायक
वाळू!
केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!
झपुर्झाच.......दुसरं काय ?
जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D
असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;)
मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;)
नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(.
!!...'मानवी भूकंप'...!!
!!...'मानवी भूकंप'...!!
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची
दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची...
असा काही झाला होता तिच्या मनावर आघात
'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात...
भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर
राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'...
प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका
एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का..
त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती
मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती..
मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले..
अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले..
मानवी भूकंपामुळे जरी झाली हो
!!! हाफ कटींग !!! .....
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk'
Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk'
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम
बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम..
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची
आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिका
काव्यरस
अभंग मुक्तछंद
रचावा अभंग परि मनी मुक्तछंद
चितारु क्षणरंग एकएका
अफाट हे जग लोकही अफाट
सुटले ते सुसाट दाहीदिशा
परि एक जलाशयी जैसे येती जगपक्षी
तैसे उतरती जालस्थली रोजरोज
अवघे ते विश्व जाली प्रगटले
नगास ते नग गेले मिळौनिया
बसावे एकजागी कराव्या त्या गोष्टी
चाखावी समष्टी वेद बोले
स्थळाचे महात्म्य काय वर्णू मी पामर
हरएक जाणे गूज जेव्हा तो सदस्य स्वये झाला
जनाचे मनाचे काथ्याकुटी काठ्या
कविंच्या कविता विडंबिती दुष्ट
पाककृती शोभा कलेचे दालन
गृहे पाकगृहे सोडून सुगरणी आल्या
पायाची भिंगरी फिरविते दाही दिशा
भटकत येती आश्रया भटकंतीच्या
विषय अगम्य प्रतिसाद महान
किती कूटगूढरम्य चर्वण चाले
करीती वादावादी विषया
काव्यरस
हस्ताक्षरातील अक्षर...
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.
मिसळपाव

