Skip to main content

समाज

थायलंड (एक अश्वत्थामा)

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 24/08/2016 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली. अमेरिकेचा आजही मित्र राष्ट्र असलेल्या 'थायलंड' देशात त्याकाळी अमेरिकेने "युद्ध-तळ" बनवला होता.

अमरबाबा

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 24/08/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
गावात पोहोचताच बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याजवळच्या मोकळ्या जागेत त्याने गाडी उभी केली. हौद्यातून गुंडाळलेले पोस्टर काढून बाहेर टांगले. 'हिमालयकी अद्भुत चमत्कारी जडीबूटीयो का चमत्कार' अशी अक्षरे असलेल्या त्या फलकावर बर्फाचा डोंगर व त्यात मधूनमधून उगवलेल्या काचेच्या, जडीबुटी भरलेल्या बरण्या असे विचित्र चित्र होते. काही वेळातच मेगाफोनवर एक टेप लागली. अमरत्व बहाल करणारी जडीबुटीवाला बाबा गावात आलाय, ही वार्ता लगेचच वाऱ्यासारखी फैलावत सुटली. बघता बघता गाडीभोवती गर्दी जमली. बाबानं आपल्या सहकाऱ्याला खूण केली, आणि बाबाचं भाषण सुरू झालं.

कावळे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले..... . स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते... . स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला........... . अश्या चोचा मारणारे कावळे आपल्याला समाजात..नात्यात नेहमी पहायला मिळतात...चोचा मारण्या साठी हे कावळे जखमा शोधत असतात..दिसली जखम मार चोच..कर घायाळ.... संवेदना हीन लोक्स

ओमरान दानीश

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 20/08/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
dan dan फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते.

मी बाई होते म्हणुनी - भाग १२

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 16/08/2016 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
‘ काकांनी एका दमात सगळं सांगुन टाकलं. मी ताईकडं पाहिलं, तिन्ं डोळ्यांनीच सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगितलं.

भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 15/08/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि तिच्या चाह्त्यांनीच तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली ) ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले. पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच.

राजाराम सीताराम........भाग १९......धूंद येथ मी स्वैर झोकीतो मद्याचे प्याले

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 11/08/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. .एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

वेताळ आणि वेताळ !

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 08/08/2016 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल.. परवा कुठल्या तरी ‘न्यूज पोर्टल’वर हा प्रश्न मला दिसला.

धर्म, विज्ञान आणि समाज

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/08/2016 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर ह्या धाग्याला प्रतिसाद म्हणून लिहीत गेले परंतू ते लांबलं. म्हणून स्वतंत्रच टाकतेय. तरिही त्या धाग्याशी संबधीत असल्याने सुरुवात बदलत नाही. एक डोंबिवलीकर म्हणून मुविंच्या उद्वेगाशी सहमत. पण एक नागरिक म्हणून या गोंधळाची जबाबदारी आपल्याकडेही येते असं मला तरी वाटतं. त्याबद्द्ल थोडंसं (१) मी बर्‍याच वर्षांपासून कचरा वाटेत टाकणार्‍यांना थोडं सुनावते. त्यासाठीची भाषाही आवर्जून चांगली वापरते. कधी कधी कचरा टाकणारी व्यक्ती शरमेने गप्प बसते कधी "तुम्हाला काय करायचयं" म्हणत अंगावर येते.

बेटी बढाओ!... कशाला?

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 05/08/2016 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी आठ महिन्यांनी जगभर महिला दिन साजरा केला जाईल. महिलांच्या संरक्षणासाठी, सबलीकरणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देणारी भाषणे ठोकली जातील... वर्षानुवर्षे महिला दिनी हेच घडत आले आहे. त्यामुळे, येऊ घातलेल्या महिला दिनाचे चित्र यापेक्षा वेगळे असणारच नाही. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने एक घोषणा दिली. ‘बस्स झाले. आता सहन करण्याचे दिवस संपले, महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ठोस कृतीची वेळ आली आहे!’ ... त्याला तीन वर्षे झाली. कृतीची वेळ आली म्हणजे नेमके काय झाले, आणि त्या वेळी कोणती कृती केली गेली, असे प्रश्न मात्र अजूनही पिंगा घालतच आहेत.