Skip to main content

समाज

एक संघ मैदानातला - भाग १६

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 05/07/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरला ८ ने मारून गटातून विजयी म्हणून बाहेर पडलो त्यामुळे जरा मस्त वाटत होत, पण त्याचबरोबर दीप्ती आणि दादा अजूनही येताना दिसत नव्हते म्हणून काळजी वाटत होती. सोलापूरला काढू शकू असा विश्वास असल्यामुळे दिप्तीला आज आराम द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि चहा घेण्यासाठी म्हणून स्टेडियम मधून बाहेर आलो. काल घरी फोन लागला नव्हता म्हणून चहानंतर घरी फोन करायचा असं ठरवलं. चहा घेतानाच लांबून दादा आणि दीप्ती दिसले. तिच्या हाताला बँडेज वैगरे नव्हतं. अंकूने दोघांना चहासाठी टपरीवर आणलं. " वाचली रे पोरगी.. " " म्हणजे ? काय झालं ?" " अगं.. म्हणजे मोठी इंज्युरी नाहीये... मला वाटलं प्लास्टर वैगरे होतंय की काय...

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची?

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.

बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान

लेखक माहितगार यांनी रविवार, 03/07/2016 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो. सहसा कोणत्याही देशात परदेशी दूतावास असलेला एरीआ सहसा उच्चतम सेक्युरीटी दिलेला असतो आणि तिथे अतीरेक्यांचे यश हि त्या देशाची एकुण सुरक्षा व्यवस्था आतून पोघरली गेली आहे का असा प्रश्न उपस्थित करते.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -११

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 02/07/2016 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’ 'हेच आपलं स्वयंवर कसं होईल, - मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती आणि ताई पण आल्या.

एक संघ मैदानातला - भाग १५

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- बाकीचे संघ हळूहळू येऊन बसत होते. स्पर्धेचा दुसरा दिवस असल्यामुळे सगळ्या टीम्स हजार होत्या. आमचा टाइमपास चालूच होता पण आम्हाला सगळ्यांना खर तर कोल्हापूर वि. वसई ह्या मॅचची उत्सुकता होती. सामने सुरू होत होते संपत होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागत होते. एकूणच माहोल संथ ही नव्हता आणि फार धसमुसळाही नव्हता. जे जे जिथे जिथे हवं तसं तसं ते ते होतं... पण काही तरी मिसिंग होतं. आता शेवटची मॅच सुरू झाली होती. आम्ही वाट पाहत होतो ती ह्याच मॅचची...

मी बाई होते म्हणुनी - भाग -१०

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 27/06/2016 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..