Skip to main content

समाज

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/06/2016 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :) कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :) आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ?

एक संघ मैदानातला - भाग १३

लेखक शि बि आय यांनी रविवार, 05/06/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही सगळ्याजणी दादा कधी परत येतायत आणि काय सांगतायत ह्याची वाट बघत होतो. आमचं आवरून झालं होत.मेस मध्ये जाऊन जेवण आणि मग रूमवर धतिंग हा अघोषित कार्यक्रम होता. ह्यावेळी 'चद्दर प्रोग्राम'चा बकरा कोण ह्याचा मी आणि योग्या विचार करत होतो. आमच्या डोळ्यांनी चाललेल्या खाणाखुणा दीदीने पहिल्या आणि डोळे वटारले. आम्हीही निर्लज्जासारखं स्माईल दिलं आणि बकरा शोध मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. तेवढ्यात डुलत-डुलत दादा आले. "दादा... कशाला आले होते ते ? काय म्हणाले ?" आम्ही दादांवर आँलमोस्ट झडप घातली. " अरे.. काय आहे हे.. थांबा जरा..

गाढवा समोर वाचली गीता - गोंधळ घालणारा गाढव ?

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 05/06/2016 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
गाढवा समोर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. हि मऱ्हाटी म्हण कित्येक वेळा वाचली किंवा ऐकली असेल. नेहमीच मनात एक प्रश्न उभा राहतो, गाढवाला मिठाच्या आणि कापूसाच्या गोणीतला फरक कळला नाही. कापूस घेऊन पाण्यात उतरल्या मुळे त्याची कंबर मोडली. गाढवाला अतोनात कष्ट सहन करावे लागले. जर गाढवाला मीठ आणि कापूस यातला फरक माहित असता तर तो कापूसाची गोणी घेऊन नदीत उतरला नसता. गाढव अडाणी होता, पण अडाणी माणसाला गीता किंवा उपदेशातले काही समजले नाही तरीही तो गोंधळ निश्चित घालणार नाही.

मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच! अनेक वेळा खूप वैताग येई.

सापडला पठ्ठ्या एकदाचा!!

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
Yamato सापडला पठ्ठ्या एकदाचा!! आई-बाप, अख्खा जपान आणि थायलंडमध्ये माझ्या सारख्याच्या जिवाला घोर लाऊन तब्बल ६ दिवसांनी एका मिल्ट्री कॅम्पच्या शेल्टरमधे सापडला. असल्या प्रकरणात माझे बाबा असते तर कानाखाली एक जाळ काढला असता आणि एका सेकंदात मॅटर क्लोज केला असता, पण इकडे जपानमधे आपल्या भारतातल्या सारखं मुलाच्या कानपटवायची सोय/मानसिकता नसल्यामुळे 'ताकायुकी तानुका' नावाच्या जापनीस बापाने मध्यम मार्ग स्वीकारला.

एक संघ मैदानातला - भाग १२

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 03/06/2016 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
केक खाताना दादाचं सेंटी होण उगाच मनात घर करून बसलं होत. बाप आपल्या मुलीचा किती विचार करत असतो ते जाणवलं. थोड्यावेळाने मँच होती त्या दृष्टीने मानसिक तयारी करण गरजेचं होत पण काही केल्या पुढचा गियर पडत नव्हता. मँचसाठी लागणारा अर्लटनेस, अँग्रेशन मला माझ्यात कुठेच दिसत नव्हत. ह्या टुर्नामेण्टला मी कॅप्टन होते. त्यामुळे माझा मेंदू घोडयापुढे धावण अपेक्षित होत पण इथे तर मन आणि मेंदू कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नव्हते. "देवा… आता काय करू? " मी बाथरूमला जाऊन आले. उगाच तोंडावर भरपूर पाणी मारलं. ग्राउंडमध्ये जाऊन अंदाज घेतला तर तिसरी मँच आत्ता सुरु झाली होती.

खरे सुपरमॅन - आमचे आप्पा

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी गुरुवार, 02/06/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच माझ्या सासर्‍यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्‍या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते. ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे.

एक संघ मैदानातला - भाग ११

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 01/06/2016 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ११ वाजून गेले तरी आम्हाला कोणालाही जाग आली नव्हती. ११.३० च्या सुमाराला आधी दार वाजल्यासारखे वाटले मग थोड्यावेळातच दादांचा आवाज आला. "ऐ जागू...दार उघड ना… ते बघ बाहेर बोंबलतायत…" रूपाने जागूला ढोसलं आणि स्वत: कूस बदलून झोपून गेली. " च्यायला… काय कटकट आहे... ह्यांना आत्ता काय इथे काय करायचं आहे..." बडबड करत जागुने दार उघडले. " काय झालं दादा... ? " "अरे मला आत तर येऊ दे...आणि तुम्ही अजून झोपा कसल्या काढताय? चला बाहेर..." बँग घेऊन दादा खोलीत घुसलेच. " दादा... प्लीज अजून थोडा वेळ झोपू दे हो.. काल अजिबात झोप नाही मिळाली... प्लीज..

मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 01/06/2016 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..